बहिणीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने मोठ्या भावाने तीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथे घडला. घटनास्थळ हे सीमावर्ती भागात असल्याने ते महाराष्ट्रात येते कि तेलंगणात याबाबत हद्दीचा वाद निर्माण झाल्याने अद्याप भोकर पोलिस डायरीत या प्रकरणी नोंद झालेली नाही.
पुजा जेठ्ठीब्बा वर्षेवार (वय २२, रा. भोकर) आणि तिचा प्रियकर गोविंद विठ्ठल कऱ्हाळे (वय २५, रा. थेरबन) यांच्या प्रेमसंबंधीची माहिती पुजाचा भाऊ दिगंबर बाबुराव दासरे (वय २५, रा. थेरबन, ता. भोकर) याला समजली. या प्रकारामुळे संतापलेल्या दिगंबरने प्रथम बहिणीचा व त्यानंतर तिच्या प्रियकराचा विळ्याने खुन केला. भोकर तालुक्यातील दिवशी बु. ते तेलंगाणा राज्यातील निवघा या दोन गावांमधील रस्त्यावर एका नाल्याजवळ मृतदेह आढळून आले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 6:24 pm