24 September 2020

News Flash

‘बसस्थानकापासून सेवा रस्त्यासह पैठण रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे’

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महानुभव आश्रम ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करीत आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियोजित महानुभव आश्रम ते पैठण रस्ता शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते पैठण असा प्रस्तावित करावा, तसेच सेवा रस्ता पैठणपर्यंत करण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत दिले.
केंब्रिज शाळा ते नगरनाका असा १४.५ किलोमीटरचा रस्ता ४५ मीटर रुंदीचा दहापदरी मंजूर होऊन सहा महिने उलटले, तरी काम सुरू झाले नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहणाअभावी रखडलेल्या जालना रस्त्याच्या व बीड बायपास विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळावी, या साठी मनपा, राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण, एमएसईबी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी सुभेदारी विश्रामगृहावर संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी समन्वय साधून राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाला मदत करण्याचे निर्देश खैरे यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महानुभव आश्रम ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करीत आहे. हा रस्ता मध्यवर्ती बसस्थानकापासून करण्यात यावा, तसेच पैठण एमआयडीसी, ऐतिहासिक पैठणनगरीचा पर्यटनाचा होणारा विकास लक्षात घेऊन सध्या सेवा रस्ता बीडकीनपर्यंत प्रस्तावित आहे. हा सेवा रस्ता पैठणपर्यंत करावा, या रस्त्याचे काम लक्षात घेऊन समांतर जलवाहिनीचे काम करावे, जेणेकरून भविष्यात जलवाहिनीचे स्थलांतर करावे लागणार नाही.
मनपाने राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाशी समन्वय ठेवावा, या बरोबरच औत्रम घाट भुयारी मार्गाच्या कामाचा आढावा घेताना जळगाव रस्ता व ए. ए. क्लब रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शहरात होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी राखीव ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चामरगोरे, नंदकुमार घोडेले, नगरसेवक हृषीकेश खैरे, शहर अभियंता सखाराम पानझडे, एमएसईबीचे मुख्य अभियंता गणेशकर, कार्यकारी अभियंता पठाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुरवंटवार, समांतर जलवाहिनीचे तारिक खान, मनपा उपायुक्त वसंत निकम आदींची उपस्थिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 3:01 am

Web Title: mp chandrakant khaire order to make paithan road four lane
Next Stories
1 मोफत वायफाय सुविधा देणार बीड देशातील तिसरे शहर
2 कर्जमाफी, शुल्कमाफीसाठी राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
3 पीककर्जासाठी बँकांत शेतकऱ्यांचे खेटे सुरूच
Just Now!
X