27 January 2020

News Flash

मारहाणीत पंचायत समिती सदस्याचा मृत्यू

अशोक माळी यांना लाठय़ा-काठय़ा व धारदार शस्त्राने मारहाण केली

संतोष माळी

औरंगाबाद :  पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथे १६ जुलै रोजी सासरा व जावयाच्या कुटुंबातील वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेची नोंद पैठण औद्योगिक पोलीस ठाण्यात झाली असून सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी दिली.

मृत पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांनी त्यांच्या मुलीचा विवाह गावातीलच बाळू शिंदे याच्याशी तीन वर्षांपूर्वी केला होता.

मात्र माळी यांची मुलगी मूकबधिर असल्याने पतीसह घरातील इतर मंडळी त्रास देत होते. १६ जुलै रोजी संतोष माळी यांचा मुलगा सागर याला मुलीला घेऊन येण्यासाठी पाठवले होते. मात्र, त्यांनी तुझ्या आई-वडिलांना पाठव म्हणून सागरला परत पाठवले.  मात्र त्यानंतर माळी व बाळू शिंदे यांच्यात जोरदार भांडण सुरूझाले व माळी यांना नामदेव सावंत, गणेश सावंत, आकाश शिंदे, बाळू शिंदे, गोकुळ शिंदे, नागू शिंदे यांनी संगनमत करून संतोष माळीसह दत्तू माळी, अशोक माळी यांना लाठय़ा-काठय़ा व धारदार शस्त्राने मारहाण केली. यात संतोष माळी यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा शुक्रवारी सकाळी औरंगाबादेत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

 

First Published on July 20, 2019 6:21 am

Web Title: panchayat samiti member death after badly assaulted zws 70
Next Stories
1 जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव ; दहा जणांविरुद्ध गुन्हा
2 औरंगाबाद-जालना मतदारसंघ आता शिवसेनेकडे?
3 मराठवाडा : दुष्काळ पुन्हा उंबरठय़ावर
Just Now!
X