संभाजी निलंगेकर यांचा दावा

गेल्या काही वर्षांत शहरातील पाणीप्रश्नामुळे लातूरकडे शिक्षण, उद्योग यासाठीचा बाहेरील लोकांचा ओढा कमी झाला असून शहराची राज्य व देशात वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. लातूरचे मूलभूत प्रश्न सोडवून या शहराला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी भाजपा महानगरपालिका निवडणुकीच्या िरगणात उतरल्याचे जिल्हय़ाचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करताना लातूर शहरातील जे प्रश्न आहेत त्या अनुषंगाने  राज्यातील मंडळी ज्या पद्धतीने लातूरकडे पाहतात ते पाहून व ऐकून मन खिन्न होते. वर्षांनुवष्रे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी जिल्हय़ाला मिळालेली असतानाही शहराचा पाणीप्रश्न, कचऱ्याचा प्रश्न अशा मूलभूत समस्या सोडवता आल्या नाहीत. निजामकालीन पाणी वितरण व्यवस्था अजूनही सुरू असल्यामुळे एक लिटर पाण्यापकी सुमारे ७० टक्के पाणी गळती होते. अमृत योजनेंतर्गत शहराचा समावेश करून आता या शहराला चोवीस तास पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाबद्दल पूर्वीच्या नगरपालिकेने व आताच्या महानगरपालिकेने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शहरवासीयांना दरुगधीच्या खाईत लोटले गेले. शहराच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून सुंदर व स्वच्छ लातूर निर्माण करण्यासाठी भाजपा निवडणुकीच्या िरगणात आहे.

शहराच्या वाहतुकीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत दहा टक्केही वाहतुकीची वर्दळ नाही. रस्ते मोठे आहेत, मात्र व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष आहे. आगामी काळात या व्यवस्था दुरुस्त करून शहरातील वाहतूक सुरळीत करणे यासाठी भाजपा निवडणुकीच्या िरगणात आहे. लातूरला देशातील टॉपटेन शहरात स्थान राहील अशी घोषणा पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी केली होती, मात्र ती अस्तित्वात आणण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. शांघाय, सिंगापूरच काय लातूरचे बाभळगावदेखील करता आले नाही. आगामी काळात कोणत्याही नागरिकाला निवृत्तीनंतर आपण लातूरमध्ये स्थिर व्हावे असे वाटेल असे शहर करण्यासाठी भाजपा निवडणुकीच्या िरगणात असल्याचे निलंगेकर म्हणाले. टंचाईमुक्त, दुष्काळमुक्त, स्वत:च्या ताकदीवर उभे असलेले सुरक्षित, सुंदर व स्वच्छ शहर निर्माण करून लातूरची एक वेगळी ओळख तयार करण्यासाठी निवडणुकीच्या िरगणात आहोत असे त्यांनी सांगितले.