15 January 2021

News Flash

गणेश मंडळांचे सामाजिक भान

शहरातील पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न, तसेच दुष्काळी स्थितीचे भान ठेवून या वर्षी बहुतांश गणेश मंडळांनी खर्चाला फाटा देत पाणी प्रश्नासंबंधी प्रबोधन आणि िवधनविहीर पुनर्भरणावर भर

शहरातील पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न, तसेच दुष्काळी स्थितीचे भान ठेवून या वर्षी बहुतांश गणेश मंडळांनी खर्चाला फाटा देत पाणी प्रश्नासंबंधी प्रबोधन आणि िवधनविहीर पुनर्भरणावर भर दिला.
मध्यवर्ती सार्वजनिक गणेश मंडळाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मंडळाने सर्व प्रकारच्या स्पर्धा रद्द करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा व मिळणारा निधी जलपुनर्भरणासाठी खर्च करण्याचे आवाहन केले होते. त्यास बहुतांश मंडळांनी प्रतिसाद दिल्याबद्दल अध्यक्ष अशोक गोिवदपूरकर व सचिव बसवंत भरडे यांनी गणेश मंडळांचे आभार मानले. हनुमान चौकातील अमर गणेश मंडळाने या वर्षी सर्व खर्चाला फाटा देत परिसरातील ६ िवधनविहिरींचे पुनर्भरण स्वनिधीतून करण्याचा निर्णय घेतला. दयाराम रोडवरील प्रभाग गणेश मंडळाने १० िवधनविहिरीचे पुनर्भरण करण्याचा संकल्प केला. गावभागातील श्रीिहद मंडळाचे या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. दहा दिवस परिसरातील कचरा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दररोज उचलला व परिसर स्वच्छ केला. िहदू-मुस्लिम सलोखा निर्माण करण्यासाठी गणेशाची आरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवण्याचा चलचित्र देखावाही मंडळाच्या वतीने सादर करण्यात आला. ११२ तरुणांनी रक्तदान केल्याचे मंडळाचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले.
शहरातील भारत रत्नदीप आझाद मंडळास विसर्जन मिरवणुकीत पहिला मान आहे. आजोबा गणपती असे या गणपतीस म्हटले जाते. मंडळाचे कार्याध्यक्ष व्यंकटेश पुरी व राजा मणियार यांनी परिसरात पाणी बचतीचे महत्त्व विशद करणारी पत्रके घरोघरी वितरीत केली. पाण्याचा थेंब थेंब वाचवून जमिनीत मुरवावा, असे आवाहन करण्यात आले. गुलालाविना मिरवणूक काढून नागरिकांनी पाण्याची बचत करावी, या साठी मंडळाने पुढाकार घेतला. विसर्जन मिरवणुकीत शेवटचा मान असणाऱ्या औसा हनुमान गणेश मंडळानेही साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. स्वच्छता, जलपुनर्भरण आदी विषयांवर प्रबोधन केले. शिवाय मंडळाच्या वतीने परिसरातील िवधनविहिरीचे पुनर्भरणही होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2015 1:10 am

Web Title: social responsibility by ganesh mandal
टॅग Ganesh Mandal
Next Stories
1 पूर्वीच्या पद्धतीनेच पैसेवारी!
2 दहा टक्के लोकांना एकदा तरी वाटते ‘आत्महत्या करावी’!
3 बकर ईदनिमित्त पावसासाठी प्रार्थना
Just Now!
X