उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना चव्हाण (वय ३०) यांनी आज (गुरूवार) सकाळी पतीच्या पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

सकाळी मोना यांनी त्यांच्या पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. त्यांना तात्काळ बार्शी येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोना यांनी आत्महत्या का केली? यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. मोना यांचे पती आणि वडीलही पोलीस दलात आहेत. पती उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये, तर वडील बीड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.