05 July 2020

News Flash

नांदेडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाची आत्महत्या

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी तीन-साडेतीनदरम्यान हा प्रकार घडला असावा.

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी तीन-साडेतीनदरम्यान हा प्रकार घडला असावा. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली.
अधीक्षक कार्यालयालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे काम करणाऱ्या मजुरांना ही बाब लक्षात येताच पोलिसांना त्यांनी ही माहिती दिली. मृताची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या वजिराबाद परिसरात तीनमजली अत्याधुनिक पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. मुख्य प्रवेशद्वारावर, तसेच अन्य ठिकाणी तपासणी केल्याशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही. मात्र, बुधवारी दुपारी याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.
कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाठवला. मयताच्या खिशात पोलिसांना एक डायरी सापडली. त्यावरून ही व्यक्ती िहगोली जिल्ह्यातील येळी येथील असावी, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी सांगितले. घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2016 1:20 am

Web Title: suicide in nanded superintendent office
टॅग Nanded
Next Stories
1 राज्यात सर्वत्र लवकरच हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी – दिवाकर रावते
2 स्माईल योजनेंतर्गत जिल्ह्य़ात दीडशे बालकामगारांची सुटका
3 रुग्णालयांनी शस्त्रक्रिया थांबविल्या
Just Now!
X