शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी सुकाणू समितीकडून सोमवारी राज्यभर ‘रास्ता रोको’ करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातही ठिकठिकाणी समितीच्यावतीने ‘रास्ता रोको’ करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. जिल्हयातील पैठण, गंगापूर वैजापूर, खुलताबाद, कन्नड, फुलंब्री आणि औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात सुकाणू समितीने ‘रास्ता रोको’ केला. सरकारनं आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना झेंडावंदन करु देणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे नियमित व थकीत कर्ज माफ करावे. तसेच पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, यासाठी शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभाव द्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि मातांना पाच हजार रुपये पेन्शन सुरु करा, तसेच त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, गाईच्या दुधाला ५० तर म्हशीच्या दुधाला ६५ रुपये भाव द्या, अशा विविध मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.

bmc 1400 crores cleaning contract case
१४०० कोटींचे कंत्राट प्रकरण: महापालिकेकडून सरकारी धोरणाचे उल्लंघन केले जात असल्यास काय करणार? उच्च न्यायालयाची विचारणा
no permission for fodder camps to curb corruption
यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय? 
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला

राज्यभर ठिकठिकाणी समितीच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. शहरातील क्रांती चौकात समितीच्यावतीनं निदर्शनं करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा ठेवण्यात आला होता. आंदोलन सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. औरंगाबाद-पुणे महामार्गावर कायगाव टोक याठिकाणी काही काळ ‘रास्ता रोको’ करण्यात आला. तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर याठिकाणी बैलगाडी रस्त्याच्या मधोमध उभी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी सुकाणू समिती आजही आक्रमक आहे.