23 January 2018

News Flash

परीक्षेला जाताना दुचाकीचा अपघात, पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

औरंगाबाद येथे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

औरंगाबाद | Updated: December 27, 2017 1:53 PM

औरंगाबादवरून खुलताबाद येथे परीक्षेला जात असलेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाला.

औरंगाबादवरून खुलताबाद येथे परीक्षेला जात असलेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाला. ही घटना आज (बुधवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास पडेगाव येथे घडली. विनोद शिवनाथ मानकापे (वय २६, रा. जातेगाव, ता. फुलंब्री) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी कल्याणी मानकापे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

अधिक माहिती अशी की, कल्याणी मानकापे या खुलताबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षेला जाण्यासाठी आज सकाळी दोघं पती-पत्नी दुचाकीवरून खुलताबादकडे जात असताना पडेगावच्या पुढे असलेल्या पठाण धाब्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (एमएच २० सीटी २०६१) दुचाकीला धडक दिली. या अपघातात विनोद यांच्या डोक्याला ट्रकचा जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. छावणी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत विनोद आणि जखमी कल्याणी यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. छावणी पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी आणि ट्रक जप्त केले आहेत. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पुण्यात होते कामाला
पत्नी कल्याणीची परीक्षा सुरु असल्याने विनोद हे मंगळवारीच पुण्याहून औरंगाबादला आले, आणि आज ही घटना घडली. विनोद आणि कल्याणी यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे सकाळी थंडी जास्त असल्याने त्यांनी चिमुकल्यास आजीच्या घरी सोडले होते.

First Published on December 27, 2017 1:53 pm

Web Title: truck crushed two wheeler in aurangabad husband dead wife injured
 1. A
  Arun
  Dec 27, 2017 at 6:31 pm
  एकीकडे चारचाकीत सुरक्षिततेसाठी सीटबेल्ट लावण्याची सक्ती केली जाते. पण त्यामानाने फारच तकलादू असलेल्या दुचाकीसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने कितीतरी कठोर पावले उचलायला हवीत पण ती उचलली जात नाहीत आणि दरवर्षी देशात लाखो नागरिक दुचाकीच्या अपघातात मृत्युमुखी पडतात तर ५ लाखहून अधिक नागरिक जन्माचे जायबंदी होतात.
  Reply
  1. V
   vijay
   Dec 27, 2017 at 5:04 pm
   दुर्दैवाचे फेरे कुणाला चुकले आहेत?त्या चिमुकल्याचं देव रक्षण करो.
   Reply