औरंगाबादमधील एम. आय.टी या कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सचिन सुरेश वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याला मंगळवारी कॉपी करताना पकडण्यात आले होते.

सचिन वाघ हा एम. आय.टी या कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगमध्ये शिकत होता. सचिनचे वडील एसटीत चालक आहेत. मंगळवारी कॉलेजमध्ये परीक्षा होती. सचिनचा न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीचा पेपर होता. सकाळी दहाच्या सुमारास परीक्षा सुरु असताना सचिनला कॉपी करताना पकडण्यात आले. यानंतर प्राचार्यांनी त्याच्या वडीलांना फोन लावला. मात्र लागला नाही. त्याला परीक्षेला बसू न दिल्याने तो बराचवेळ गॅलरीत बसून राहिला. गॅलरीत कोणी नाही हे पाहिल्यानंतर त त्यानं खिडकीत जाऊन उडी मारली. यात गंभीर जखमी झालेल्या सचिनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

सुरुवातीला सचिनला फी भरु न दिल्याने परीक्षेत बसू दिले नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, कॉलेज प्रशासनाने सचिनने पूर्ण फी भरली होती, असे स्पष्ट केले आहे. उडी मारण्यापूर्वी सचिनने शुभम राठोड, आणि सौरभ रनदिवे या मित्रांना फोन केला. सौरभने पहिला फोन उचलला नाही. मात्र दोन्ही मित्रांचे फोन आल्यानं त्यानं दुसरा कॉल उचलला. त्याला सचिनने आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. मात्र तो पोहचेपर्यंत त्यानं उडी मारली होती.