News Flash

औरंगाबादेत तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

रवींद्र कल्याण जाधव

औरंगाबाद जिल्हयातील चिंचोली तांडा येथे रवींद्र कल्याण जाधव  ( वय १९ ) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. आरोपी विरोधात चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुरुवारी रात्री रवींद्र घरात टीव्ही पाहत बसला होता. साडेनऊच्या सुमारास आरोपी रामेश्वर शिवलाल पवार  त्या ठिकाणी आला. काम आहे असे सांगत त्याने रवींद्रला घरातून बाहेर नेले व धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. हत्येनंतर रवींद्रचा मृतदेह जवळच्या शेतात फेकून पसार झाला या प्रकरणी आरोपी विरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून या हत्येवेळी एक प्रत्यक्षदर्शी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.  कोणत्या कारणावरून रवींद्रची हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 12:51 pm

Web Title: young man killed with a weapon in aurangabad
Next Stories
1 शौचालय असेल तरच बोला! सभापतींच्या कार्यालयातील पाटी ठरतेय लक्षवेधी
2 वस्तू व सेवाकर विभागाचा तुघलकी कारभार
3 औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य सभागृहाचे छत कोसळले
Just Now!
X