धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने एक हजार ३२८ कोटी रुपयांचा निधी छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला होता. तो आराखडा आता अंतिम करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार दोन हजार १०० कोटी रुपयांचा परिपूर्ण अंतिम विकास आराखडा राज्य शासनाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी आज मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. आता लवकरच या अंतिम विकास आरखड्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे करण्यासाठी आपण मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. जगभरातील भाविक तुळजापुरात यावे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात अर्थकारणाला बळकटी मिळावी व त्यातून हजारोंची रोजगार निर्मिती व्हावी हे त्यामागील उद्देश आहे.संकल्पित आराखड्याचे आपण दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी जनतेसमोर सादरीकरण करून त्यांच्या हरकती व सूचना मागवल्या होत्या.आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर १६ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत एक हजार ३२८ कोटींचा निधी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आपल्या महायुती सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर २८ जुलै २०२४ रोजी परिपूर्ण विकास आराखडा तयार करण्यासाठी संकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी रीतसर निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सहभागी झालेल्या विविध वास्तुविशारद कंपन्यांनी अधिक परिपूर्ण असे सादरीकरण केले. त्यातून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आलेल्या संकल्पनेचा अंतिम आराखड्यात समावेश करण्यात आला असल्याचे चित्र आमदार पाटील यांनी सांगितले.

Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
Versova-Bhyander Coastal Road Project, contracts ,
वर्सोवा-भाईंदर किनारपट्टी मार्ग प्रकल्पाचे गौडबंगाल, महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात
mmrda planned various road projects to solve traffic congestion problem in thane kalyan and navi mumbai
ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
hawker removal team of A ward of municipality took action on hawkers in Shahad railway station
कल्याणजवळील शहाड रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर कारवाई, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फलक कमानी, निवारे जमीनदोस्त
MIDC accelerates Rs 650 crore flyover works including alternative roads in Hinjewadi IT Park
हिंजवडी आयटी पार्क लवकरच ‘कोंडी’मुक्त! पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या ६५० कोटींच्या कामांना एमआयडीसीकडून गती

हेही वाचा : Mahant Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; टागोर यांच्या नोबेल पुरस्काराबाबत म्हणाले…

तुळजाभवानी देवीचे क्षेत्र वैश्विक दर्जांचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी सर्वसमावेशक प्रक्रियेचा अंगीकार करण्यात आला आहे. २० जून २०२४ रोजी या आराखड्याचे पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर १५ जुलै २०२४ रोजी आराखड्याची इत्यंभूत माहिती मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. शहर आणि परिसरातील नागरिकांच्या सूचना व हरकती मागवून घेण्यात आल्या. नागरिकांच्या सूचना, आक्षेप जाणून घेण्यासाठी २० जुलै रोजी आपण स्वतः शहरवासीयांसोवत बैठक घेतली. आलेल्या सूचनांवर निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन केली. पुजारी, भाविक व शहरवासीयांच्या सूचनांचा अभ्यास करुन योग्य आक्षेप व सूचनांचा आरखड्यात नव्याने अंतर्भाव करण्यात आला त्यामुळे प्रस्तावित आरखड्याची प्रकल्प किंमत रु.१३२८ कोटींवरून रु.२१०० कोटी एवढी झाली असल्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले .

भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा

तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रचलित दाराच्या कैकपटीने विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या या अंतिम विकास आराखड्यात तब्बल ५०० कोटी रुपयांची तरतुद केवळ भूसंपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी संपादित केली जाणार आहे त्यांना समाधानकारक मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन, तसेच जमिनीचा चांगला मोबदला देऊन आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : प्रेमप्रकरणातून बहिणीला डोंगरावरून ढकलले; तरुणीचा मृत्यू

दर्शन मंडपात विविध सुविधा

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील अनुषंगिक सुविधा, घाटशिळ व हडको येथे भाविक सुविधा केंद्र, शहरात व शहराच्या प्रमुख रस्त्यावरील प्रवेशद्वारावर आकर्षक कमान, वृंदावन गार्डनप्रमाणे आधुनिक उद्यान, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच विकासकामांसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता देखील निधीची तरतूद ठेवण्यात आली आहे. भूसंपादन व शासकीय करापोटी आवश्यक असणारे शुल्क तसेच विकासकामांसाठी लागणारा निधी असा एकूण दोन हजार शंभर कोटी रुपयांचा अंतिम आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

Story img Loader