scorecardresearch

पोलीस विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी पदे भरण्यास मान्यता

पोलीस दलातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या हवालदारांमधून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्यांची नावे कळवावीत असे आदेश अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांनी बजावले आहेत.

औरंगाबाद: पोलीस विभागातील स्थापत्य अभियंता व उपअभियंता ही पदे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याने आता पोलीस दलातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या हवालदारांमधून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्यांची नावे कळवावीत असे आदेश अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांनी बजावले आहेत. याच बरोबर पोलीस उपाअधीक्षकांची सात व पोलीस उपनिरीक्षक पदाची ५३ पदे  अशी ६० पदे भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात स्थापत्य अभियांत्रिकीसह विविध शाखेतील अनेक उमेदवार पोलीस दलात हवालदार म्हणून रुजू झाले आहेत. अशा हवालदारांनी कार्यालयीन कामात टंकलेखनासह तांत्रिक स्वरुपाची कामे कार्यालयात दिली जातात. शिकलेल्या या तरुणांमधून पोलीस दलातील स्थापत्य अभियंत्याची पदे भरता येऊ शकतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. अशी पदे भरण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने भरती प्रक्रियेसाठी काहीही केली नाही.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Approval to fill civil engineering posts in police department akp