औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने आज २०७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून शहरातील २२४ रस्ते चकाचक होतील, असा विश्वास पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

हेही वाचा >>> राज्यसभा निवडणूक : मविआचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये, तर भाजपाच्या आमदारांचा ताजमध्ये मुक्काम; घोडेबाजार रोखण्यासाठी प्रयत्न

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत रस्त्यांसाठी शहरातील रस्त्यांसाठी यापूर्वी ३१७ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आता आणखी २२४ रस्ते केले जाणार असून त्यासाठी २०७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एकूण ५२४ कोटी रुपये रस्त्यासाठी खर्च होत आहे. या निमित्ताने शहरातील नागरिकांना चकाचक रस्ते मिळतील. स्थानिक आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठी, आंबादास दानवे यांच्या सततच्या पाठपुराठ्यानंतर महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी हा निधी मंजूर केला.

हेही वाचा >>> कानपूरच्या घटनेप्रकरणी मीडियावर एकतर्फी व्हिडिओ दाखवले जाताय – ओवेसींचा आरोप!

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठिंब्याने शहरासाठी ही भेट देताना आनंद होत असल्याची भावना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.