पावसात वीज कोसळल्याने भावाचा मृत्यू; बहीण जखमी

आपल्या आई-वडिलांसमवेत शेतात कापूस खुरपणी व खत टाकण्यासाठी गेलेल्या बहीण-भावावर वीज कोसळून भावाचा जागीच मृत्यू झाला,

आपल्या आई-वडिलांसमवेत शेतात कापूस खुरपणी व खत टाकण्यासाठी गेलेल्या बहीण-भावावर वीज कोसळून भावाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली. पैठण तालुक्यातील नवगाव-तुळजापूर शिवारात चारी क्रमांक नऊजवळ मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा प्रकार घडला. नवगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू असताना हा प्रकार घडला.
फारूख महेताब शेख (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याची बहीण सुलताना (वय १५) ही गंभीर जखमी झाली. वीज कोसळल्यानंतर या बहीण-भावाला ग्रामस्थांनी पैठणच्या सरकारी दवाखान्यात आणले. सुलताना हिच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठविण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Brother died due to collapsed lighting sister injured