काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरात एका महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारली होती. ही घटना ताजी असताना आता एका अल्पवयीन मुलीनं भरधाव वेगात असणाऱ्या रिक्षातून उडी मारली आहे. शिकवणीचा वर्ग संपल्यानंतर संबंधित मुलगी आपल्या घरी जाण्यासाठी एका रिक्षात बसली. काही अंतर दूर गेल्यानंतर रिक्षा चालकानं संबंधित अल्पवयीन मुलीची छेड काढली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दुर्दैवी घटनेत पीडित मुलीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी औरंगाबादेतील क्रांती चौक पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं आहे. सय्यद अकबर सय्यद हमीद असं या रिक्षाचालकाचे नाव आहे.

हेही वाचा- धक्कादायक! औरंगाबादेत रिक्षाचालकाकडून अश्लिल संभाषण, छेडछाड; तरुणीने धावत्या रिक्षातून घेतली उडी

ही घटना जेव्हा घडली, तेव्ही जखमी मुलीला रिक्षाबद्दल काहीही माहिती नव्हती. पण पोलिसांनी तातडीने पावलं उचलतं. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि अवघ्या काही तासात आरोपीला जेरबंद केलं आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

या घटनाक्रमानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत दराडे महिला आणि मुलींना आवाहन केलं आहे. “सर्व मुली आणि महिलांनी रिक्षात बसताना रिक्षाचा एक फोटो काढावा, आपल्या सर्वांकडे स्मार्ट फोन आहे, त्याचा वापर करावा. तुम्ही रिक्षाच्या नंबरप्लेटचा फोटो काढल्यास होणारा अन्याय टाळता येईल, असंही दराडे म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime in aurangabad school girl jump from running rickshaw police advice to girls rmm
First published on: 16-11-2022 at 22:52 IST