संरक्षणाशी संबंधित उत्पादने निर्माण करण्याची मोठी क्षमता आणि योग्य वातावरण असल्याने चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरने (सीएमआयए) औरंगाबाद येथे ‘डिफेन्स क्लस्टर’ स्थापन करण्यास पुढाकार घेतला आहे.
मराठवाडा ऑटो क्लस्टरची यशस्वी स्थापना आणि अंमलबजावणी, तसेच सध्या सुरू असलेले देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर स्थापन करण्याचे काम या पाश्र्वभूमीवर सीएमआयएने आता औरंगाबाद येथे ‘डिफेन्स क्लस्टर’ स्थापन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. डीएमआयसी शेंद्रा-बिडकीन येथे असलेल्या ‘ऑरिक सिटी’नेही ‘संरक्षण क्षेत्रा’वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आता संरक्षणासंबंधी उत्पादन क्षेत्रात औरंगाबादला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होऊ शकणार आहे. गोवा येथे २८ ते ३१ मार्च दरम्यान होणाऱ्या ‘डिफेक्सपो इंडिया २०१६’ या महत्त्वाच्या संरक्षण प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी १० सदस्यांचा गट सीएमआयएने तयार केला आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. ‘डिफेक्सपो इंडिया २०१६’ हे या शृंखलेतील नववे प्रदर्शन असून, दक्षिण गोव्याच्या क्युपेम तालुक्यातील नाकेरी क्वितोल येथे आयोजिल्या जात असलेल्या प्रदर्शनाला प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डिफेक्सपो इंडिया शृंखलेतील आठवे प्रदर्शन दिल्ली येथे फेब्रुवारी २०१४ मध्ये भरवण्यात आले. या वेळी पूर्वीच्या प्रदर्शनापेक्षा चांगला प्रतिसाद मिळून सहभागी देश-विदेशातील कंपन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. प्रदर्शनात ३२ देशांतील २३२ कंपन्यांनी सहभाग नोंदवला. डिफेक्सपो २०१४ ने सर्व सहभागींना त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि उत्पादने प्रदíशत करण्यास व्यासपीठ दिले. परस्परांच्या लाभासाठी व्यवसाय क्षमता व बाजारपेठेचा अंदाज घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. या प्रदर्शनात सर्वाधिक ५८ देशांतील ६३ अधिकृत शिष्टमंडळे सहभागी झाली होती.
‘डिफेक्सपो इंडिया २०१६’चे महत्त्व लक्षात घेता, संरक्षणाशी संबंधित उत्पादने तयार करण्यासंदर्भात औरंगाबादची क्षमता प्रदíशत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी सीएमआयएने पुढाकार घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2016 रोजी प्रकाशित
‘डिफेन्स क्लस्टर’साठी सीएमआयएचा पुढाकार
संरक्षणाशी संबंधित उत्पादने निर्माण करण्याची मोठी क्षमता आणि योग्य वातावरण असल्याने औरंगाबाद येथे ‘डिफेन्स क्लस्टर’ स्थापन करण्यास पुढाकार घेतला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 06-03-2016 at 01:35 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defence cluster cmia initiative