छत्रपती संभाजीनगर – बीडच्या परळीमध्ये अवघ्या ७८ तासांत नकोशा वाटणाऱ्या आठ महिने व तीन दिवसांच्या मुली रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली.दोन दिवसांपूर्वी मालेवाडी रस्त्यावर आठ महिन्यांची एक मुलगी पिशवीत आढळून आली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास परळीजवळ असलेल्या नंदगौळ रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोत अंदाजे तीन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक एका कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण गित्ते, उपनिरीक्षक, गणेश झांबरे आदींनी कचरा डेपोच्या ठिकाणी धाव घेऊन मुलीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.