पैठणच्या जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रात सुरू असलेला अवैध वाळू उपसा वन्यजीव विभाग, महसूल व नेवासा पोलीस आदींच्या पथकाने छापा मारून उद्ध्वस्त केला. अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम नियत क्षेत्रातील म्हाळापूरमध्ये २४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कारवाईमध्ये एक तराफा, डंपर असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांनी दिली. डॉ. नाळे, विभागीय वन अधिकारी अमित कुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईत वनपाल बांगर, कन्नड, नागद वनपरिक्षेत्र अधिकारी अनुक्रमे राहुल शेळके, सागर ढोले, महसूलचे सुनील लावंडे, नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, वनपाल रूपाली सोळसे, संदीप मोरे आदींचा सहभाग होता.