छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. लोहा तालुक्यात दोघांचा बुडून तर किनवट तालुक्यातील दोघांचा अपघाती मृत्यू झाला. जोरदार धडक बसल्यानंतर चक्काचूर झालेली दुचाकी ट्रक खाली आली. त्यामुळे पेट्रोलची टाकी फुटून पेट घेतला आणि आगीच्या भडक्यात ट्रक जळून खाक झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच तर दुसऱ्याचा गंभीर जखमी होऊन उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही घटना नांदेड महामार्गावरील सावरी घाटामध्ये रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.

किनवट तालुक्यातील येंदापेंदा जवळील नागडोह या गावचे रहिवासी माधव दादाराव कार्लेवाड (वय ३५) व शिवाजी कोंडबा तिगलवाड (वय ६०) हे दोघेही दुचाकीने तेलंगणातील आडेली पोच्चव्वा येथे देवीच्या दर्शनासाठी नांदेडमार्गे शिवणी फाट्याकडे जात होते. बोधडी ओलांडून सावरी घाटात आल्यानंतर समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या एक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. त्यात त्यांची दुचाकी ट्रकखाली येऊन ते सुमारे एक ते दीड फर्लांग फरफटत गेले. त्यात दुचाकीच्या मागे बसलेले शिवाजी तिगलवाड हे जागीच ठार झाले तर चालक शिवाजी कार्लेवाड हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, ट्रकखाली आलेल्या दुचाकीचे अक्षरश: तुकडे उडून रस्त्यावर विखुरल्या गेले. त्यातच पेट्रोल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडून ट्रकनेही भीषण पेट घेतला.

Marine Drive cleaning drive
टीम इंडियाच्या विजयी परेडनंतर मरीन ड्राईव्हवर ११ हजार किलोंचा कचरा जमा; स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मात्र अनुल्लेख
Seven cow and Buffaloes died due to lightning in Pisvali near Dombivli
डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू
Buffaloes die on the spot due to lightning in the stream Demand in Assembly for compensation
ओढ्यात विजेच्या झटक्याने म्हशींचा जागीच मृत्यू; नुकसान भरपाईसाठी विधानसभेत मागणी
case has been registered in the death of two children due to suffocation in a motor vehicle
मुंबई : मोटरगाडीमध्ये गुदमरून दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
Ayodhya Women Falls In Pothole Viral Video
अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
Contract doctor dismissed in case of child death in gadchiroli 
गडचिरोली : उपचारात हलगर्जीपणा भोवला ! बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी डॉक्टर बडतर्फ; लोकसत्ताच्या वृत्ताची दखल
Death of an infant due to open DP of Mahavitran in vasai
महावितरणाच्या उघड्या डीपी मुळे चिमुकल्याचा मृत्यू
Dilip Mohite Patil nephew pune highway accident
पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात पुन्हा भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू

हेही वाचा : तेवीस मंडळांत दमदार पाऊस; धाराशिव, कळंब तालुक्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा

दरम्यान रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काहींनी मृत व जखमीस गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेत असतांना जखमी माधव कार्लेवाड यांचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात कर्तव्यावरील डॉ. मुंगळकर यांनी जखमी माधव यास तपासल्यानंतर मृत घोषित केले. येंदापेंदाचे उपसरपंच शिवाजी व्यंकटी भताने यांचेसह ग्रामस्थ व नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेतले. राजू तिगलवाड याने किनवट ठाण्यात अपघाताची फिर्याद नोंदवली. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा : बीडमध्ये तणाव; पंकजा मुंडेंनंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

तरुणांचा बुडून मृत्यू

लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथील दोन तरुणांचा विहिरीत पोहायला गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. बेटसांगवी येथील तरुण शेतकरी संतोष सखाराम वानखेडे (वय २२) आणि राजेश गणेशराव वानखेडे (१७) हे शेतामध्ये पेरणीचे काम आटोपून घराकडे परतत होते. यावेळी त्यांना उष्णतेमुळे विहिरीमध्ये पोहण्याची इच्छा झाली. त्यामुळे दोघेही विहिरीवर जावून पोहायला उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. संतोष वानखेडे यांच्या पश्चात आई, वडील व दोन बहिण तर राजेश वानखेडेला आई-वडिलांसह एक भाऊ आहे. दोन्ही तरुणांची विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून बेटसांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.