सुमारे अडीच हजार वर्षांहून अधिक काळाचे अवशेष तेरनगरी आजही अभिमानाने मिरवत आहे. या वारशाला आता जागतिक मत्रीचे कोंदण मिळणार आहे. जर्मनीचे विद्यार्थी तेरमधील विद्यार्थ्यांशी सांस्कृतिक आदानप्रदान करून नव्या मत्रीला आयाम देणार आहेत.
नेरूळचे तेरणा विद्यालय व जर्मनीच्या ब्रेमेन शहरातील विद्यार्थी गेल्या ३ वर्षांपासून आपापल्या देशांतील संस्कृतीची देवाणघेवाण करीत आहेत. नेरूळचे काही विद्यार्थी जर्मनीच्या ब्रमन शहरात काही दिवस वास्तव्यास होते. वेगवेगळ्या संस्कृतीच्या माहितीची हे विद्यार्थी आदानप्रदान करतात. त्याचाच भाग म्हणून या वर्षी ब्रमनचे दहा विद्यार्थी-विद्याíथनी व दोन शिक्षक प्रा. बाळकृष्ण लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. १२) येडशी येथील गुरुकुलला भेट देऊन औषधी वनस्पतींची माहिती घेणार आहेत. मंगळवारी तेर येथील तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास भेट देऊन स्वच्छतेचे आरोग्यास फायदे, सीडीद्वारे महत्त्व पटवून देणे, तंबाखू सेवन केल्यानंतर होणारे दुष्परिणाम या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. या बरोबरच रामिलगप्पा लामतुरे पुरातन वस्तुसंग्रहालयास भेट देऊन रोम आणि तेरच्या सांस्कृतिक ठेव्याला उजाळा देणार आहेत. श्रीसंत गोरोबा काका मंदिराला भेट देऊन गोरोबा काकांचे दर्शन घेणार आहेत. जर्मनीतील विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या ७०० युरोमधून स्वच्छतेस लागणारे साहित्यही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नेरूळ येथील तेरणा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हिना समानी यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2015 रोजी प्रकाशित
तेरच्या जागतिक वारशाला आंतरराष्ट्रीय मत्रीचे कोंदण!
सुमारे अडीच हजार वर्षांहून अधिक काळाचे अवशेष तेरनगरी आजही अभिमानाने मिरवत आहे. या वारशाला आता जागतिक मत्रीचे कोंदण मिळणार आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 10-10-2015 at 01:50 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International friendship