छत्रपती संभाजीनगर : आरक्षण आंदोलनामुळे मतांवर होणारा संभाव्य परिणाम कमी करण्याबाबत भाजपच्या नेत्यांनी मराठवाड्यातील भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सूचना दिल्या. आगामी काळात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे तीन हजार मेळावे घेण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका क्षेत्रांत लाभार्थ्यांचे सत्कार करण्यासाठी शासकीय कार्यक्रम घेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला. ते म्हणाले, की सध्या एक कोटी ६० लाख महिलांना प्रतिमाह १५०० रुपये दिले जात आहेत. ही संख्या २.५० कोटींपर्यंत वाढवत न्यायची आहे. महिलांमध्ये जाती – धर्माच्या पुढे जाऊन मतदान करण्याची तयारी दिसते आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर ३६ नाही तर त्यापेक्षा जास्त मते लाडक्या बहिणीच वाढवून देतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा >>>छत्रपती संभाजीनगर: विद्यापीठाच्या ग्रंथालयात पावसाचे पाणी शिरले; प्रशासनाची तारांबळ

लोकसभा निवडणुकीतील नकारात्मकता घालविणारी योजना म्हणून सत्ताधाऱ्यांनी महिला मतपेढीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय दसऱ्यापासून दिवाळीच्या धनत्रयोदशीपर्यंत मोटार सायकल रॅली, लाभार्थींच्या गाठीभेटी असे अनेक कार्यक्रम भाजप कार्यकर्त्यांना नेते अमित शहा यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरक्षण आंदोलनांमुळे मतांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी महिला मतपेढीतून ही कसर भरून काढण्याची रणनीती भाजपने आखली आहे.