scorecardresearch

Premium

वयोवृद्धांसाठी युरोपॅन्ट

वाढत्या वयात मूत्रविसर्जनावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका असतो. यावर उपाय म्हणून …

वयोवृद्धांसाठी युरोपॅन्ट

वाढत्या वयात मूत्रविसर्जनावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका असतो. यावर उपाय म्हणून औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयातील डॉ. प्रसाद वैद्य यांनी युरोपॅन्ट विकसित केली आहे. या पॅन्टच्या पेटंटसाठीही अर्ज करण्यात आला. छत्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या कपडय़ापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचा उपयोग करून ही पॅन्ट तयार करण्यात आली आहे. पोटरीवर बांधलेल्या पिशवीत मूत्र जमा होते. प्रवासातही गाडीतून खाली न उतरता या युरोपॅन्टचा उपयोग करता येतो. त्यामुळे वृद्ध आणि मूत्ररोग असणाऱ्यांना या पॅन्टचा अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. ही पिशवी औरंगाबाद येथील पंचशील मेडिकलमध्ये उपलब्ध असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारची पॅन्ट विकसित करण्यास डॉ. वैद्य प्रयत्न करीत होते. अनेक प्रकारे डिझाइन करून पाहिल्यानंतर युरोपॅन्ट विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले.
मणक्याची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना लघवीसाठी वारंवार जावे लागते. तसेच मधुमेह व मूत्रिपडात खडे असणाऱ्यांनाही हा त्रास जाणवतो. त्यामुळे मूत्रमार्गात जंतूसंसर्गही होतो. यावर उपाय म्हणजे मूत्रविसर्जनाची भावना होईल, तेव्हा ती क्रिया करणे आवश्यक असते. या साठी युरोपॅन्टचा चांगला उपयोग होत असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून ही पॅन्ट वापरणारे पी. आर पानसे म्हणाले, की या पॅन्टचा चांगला उपयोग होत आहे. अगदी सार्वजनिक ठिकाणीही दोन पायांत ठरावीक अंतर ठेवून ही पॅन्ट वापरता येते. अंडरवेअरसारख्या आकाराच्या या पॅन्टला पायाच्या पोटरीजवळ पिशवी बांधलेली असते. ही पिशवी ठेवण्यास पॅन्टमध्ये खिसा बनविण्यात आला आहे. या नव्या युरोपॅन्टचा उपयोग शहरातील १०० हून अधिक वयोवृद्ध करीत आहेत. युरोपॅन्टच्या वापराने चालता येणाऱ्या वयोवृद्धांची समस्या सुटणार असल्याचा दावा डॉ. वैद्य यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Older age pant

First published on: 03-03-2016 at 03:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×