औरंगाबाद : मिट्ट काळोखाच्या विरोधातील प्रतीक म्हणून सुरेश भट यांच्या गझलमध्ये वापरली जाणारी ‘मशाल’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चिन्ह म्हणून मिळाली आणि ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या ओळींसह चिन्ह पोहोचविण्यासाठी मराठवाडय़ात घाई सुरू झाली. पण एका योगायोगाची चर्चा आता उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक आहे. ती म्हणजे चिन्ह जाहीर होताच उस्मानाबाद शहरातील सांजा रोड भागात ‘मशाली’ची मोठी प्रतिकृती उभी राहिली.

तुळजापूर येणाऱ्या भवानी ज्योतीची प्रतिकृती करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी केलेला अर्ज मंजूर झाला. तशी प्रतिकृती बनवून घेतली गेली. त्याचा लोकार्पण सोहळा झाला आणि तेच चिन्ह शिवसेनेला मिळाले. या  कार्यक्रमाच्या छायाचित्राला आता ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या ओळी पार्श्वसंगीत म्हणून आपसुकच कोणीतरी जोडल्या आणि चिन्हाचा प्रचार सुरू झाला.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Suresh Halvankar, Kolhapur,
कोल्हापूर : सत्तेत न येणाऱ्याच्याच फुकट देण्याच्या घोषणा – सुरेश हाळवणकर
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

 औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांतील शिवसेनेची ताकद उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार तानाजी सावंत आरोग्यमंत्री झाले, तर औरंगाबाद जिल्ह्यात संदीपान भुमरे. अब्दुल सत्तार हे दोघे जण अनुक्रमे रोजगार हमी आणि कृषीमंत्री झाले. मराठवाडय़ात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. परभणी जिल्हा वगळता मराठवाडय़ातील अन्य सर्व जिल्ह्यांत बडे नेते सत्ताधारी गटात सहभागी झाले. पण सामान्य शिवसैनिक मात्र सत्तापटावर चाललेल्या संघर्षांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करू लागला. उस्मानाबाद जिल्ह्यात सेनेची बांधणी करण्यात खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी सुरुवात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळाल्यानंतर काही तासांत तसे पोस्टर्स गावागावात लागू लागले आहेत. त्याचबरोबर ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे पार्श्वसंगीत असणारी ओळ समाजमाध्यमातून ऐकविली जात आहे.

 ‘मशाल चिन्ह’ उस्मानाबाद जिल्ह्यात तर अधिक शुभ मानले जात आहे. नवरात्रीमध्ये गावागोवी सार्वजनिक नवरात्र महोत्सवासाठी ‘भवानी ज्योत’ नेण्याची पद्धत आहे. त्या ज्योतीची प्रतिकृती चौकात बसविण्याचे शिवसेना नेत्यांनी ठरविले होते. आता तेच पक्षाचे राजकीय चिन्ह झाल्याचा उस्मानाबाद जिल्ह्यात आनंद साजरा होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही आता मशाल या चिन्हासह शिवसैनिकांनी प्रचारफेरी काढली. शिवसेनेचे मशाल चिन्हाचे मराठवाडय़ात जुने नाते शिवसेनेचे पहिले खासदार मोरेश्वर सावे हे मशाल चिन्हांवर निवडून आले होते. ते पुढे खासदार झाले. अगदी अयोध्यातील धार्मिकस्थळ पाडण्याच्या दाखल गुन्ह्यातही त्याचे नाव होते. त्यामुळे मशाल या चिन्हाशी नाते आहेच, असा दावाही शिवसेनेकडून केला जात आहे.