Pishore Kannad Road Accident Update : छत्रपती संभाजीनगर : ट्रक उलटल्याने त्यातील उसाच्या मोळ्यांखाली दबून सहा तरुण कामगारांचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले. सोमवारी पहाटे ही घटना पिशोर ते कन्नड मार्गावरील खाडी चंदन नाल्याजवळ घडली. किसन धर्मु राठोड (वय ३०), मनोज नामदेव चव्हाण (२३), कृष्णा मुलचंद राठोड (३०), मिथुन चव्हाण (२६), विनोद नामदेव चव्हाण (२८, सर्व रा. सातकुंड, ता. कन्नड) व ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण (३६, रा. बिलखेडा ता. कन्नड), अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती पिशोरचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांनी दिली.

यातील ज्ञानेश्वर चव्हाण यांचा छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी चाळीसगाव येथे, तिघांना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक त्रिलोकचंद पवार यांनी दिली. तीन जखमींना सुरुवातीला कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.

ऊसतोड कामगार हे वाकत येथून रसवंतीसाठी ऊस घेऊन येत होते. ट्रक पूर्ण भरून झाल्यानंतर वाहनाने गावाकडे यायची तयार करत होते. मात्र, वाहन न मिळाल्याने उसाने भरलेल्या ट्रकवरच बसून ते पिशाेरकडूनन कन्नडकडे येत होते. याच मार्गावरील घाटात चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींची नावे

इंदरचंद प्रेमसिंग चव्हाण, रवींद्र नामदेव चव्हाण, राणी लखन राठोड, लखन छगन राठोडे, सागर भागीनाथ राठोड, राहुल नामदेव चव्हाण, सचिन भागीनाथ राठोडे, आरती ज्ञानेश्वर चव्हाण, मारू भिका चव्हाण, नामदेव भिका चव्हाण व अनिता नामदेव चव्हाण, अशी जखमींची नावे आहेत.