छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी मंदिरातील सिंहगाभाऱ्यातून दर्शन आता बंद करण्यात आले आहे. भवानी शंकर मंदिरापासून देवीचे दर्शन होईल. पण सशुल्क दर्शन दहा दिवस बंद राहील, असे तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने कळविले आहे.
तुळजाभवानी देवी मंदिरात मागील सहा महिन्यांपासून जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामामुळे तुळजाभवानी देवीचे धर्मदर्शन व पेडदर्शन उद्यापासून (शुक्रवारी) १० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले. सिंहगाभाऱ्यात पुरातत्त्व खात्यामार्फत जीर्णोद्धाराचे काम पार पाडले जाणार आहे. या काळात धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व मुखदर्शन सुरू राहणार आहे. मंदिरातील गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्यात आले आहे. भवानीशंकर मंदिराच्या समोर उभे राहून देवीचे दर्शन घेता येईल, असे सांगण्यात येते.
जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार म्हणाले, ‘मंदिराच्या गाभाऱ्यात दोन ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे दहा दिवस केवळ मुखदर्शन होईल. बाकी सर्व धार्मिक विधी सुरू राहणार आहेत.’