2022 Toyota Fortuner GR Sport: टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motor) गेल्या वर्षी जानेवारीमध्ये फेसलिफ्टेड फॉर्च्युनर (facelifted Fortuner) आणि नवीन फॉर्च्युनर लिजेंडर (Fortuner Legender) भारतात लाँच केली होती. कंपनी आता या एसयूव्हीचे स्पोर्टी व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. टोयोटा लवकरच भारतीय बाजारपेठेत फॉर्च्युनर जीआर (Gazoo Racing) स्पोर्ट एडिशन सादर करणार आहे, ज्यामध्ये उत्कृष्ट लुकसह अनेक उत्कृष्ट फीचर्स असतील. लाँच होण्यापूर्वी, ही आलिशान एसयूव्ही (SUV) आधीच डीलरशिपवर येण्यास सुरुवात झाली आहे. या एसयूव्हीची खासियत काय आहे ते जाणून घेऊया.

करण्यात आले आहेत अनेक बदल

आगामी टोयोटा फॉर्च्युनर जीआर स्पोर्ट टॉप-स्पेक लेजेंडर ट्रिमवर आधारित असेल आणि आता या एसयूव्हीच्या भारतीय लाइन-अपमधील फ्लॅगशिप व्हेरिएंट असेल. फॉर्च्युनर जीआर स्पोर्टला आतून आणि बाहेरून स्पोर्टियर अपडेट्स मिळतील. समोर, एसयूव्हीच्या थाई-स्पेक मॉडेलला अधिक आक्रमक बंपर, नवीन फॉग लॅम्प हाउसिंग आणि अपडेटेड एअर डॅम मिळतो. फॉर्च्युनर जीआर स्पोर्टमध्ये अनेक ब्लॅक-आउट एलिमेंट मिळतात, ज्यामध्ये ऑल-ब्लॅक अलॉय व्हील, स्किड प्लेट्स आणि ORVM यांचा समावेश होतो. याला टेलगेटवर अपडेटेड रियर बंपर तसेच जीआर स्पोर्ट बॅजिंग मिळते.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
apple sent alert emails to iphone users
काही भारतीयांच्या ‘आयफोन’मध्ये स्पायवेअर असू शकतं; अ‍ॅपलची धोक्याची सूचना!
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?

(हे ही वाचा: Summer Car Care Tips: उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या तुमच्या कारची काळजी, फॉलो करा सोप्या टिप्स)

(हे ही वाचा: CNG Car Tips: उन्हाळ्यात तुमच्या सीएनजी कारची ‘अशी’ घ्या काळजी; लक्षात ठेवा ‘या’ पाच गोष्टी)

इंजिनचे तपशील

नवीन टोयोटा फॉर्च्युनर जीआर स्पोर्ट फक्त डिझेल पॉवरप्लांटसह ऑफर केली जाईल. हे २.८ लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित असेल जे २०१ एचपी पॉवर आणि ५०० ​​एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६ स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल आणि ४×२ तसेच ४×४ ड्राइव्हट्रेनसह ऑफर केले जाण्याची अपेक्षा आहे.