scorecardresearch

Hyundai Venue: जबरदस्त फीचर्ससह लाँच होणार नवीन वेन्यू, मिळणार शक्तिशाली डिझेल इंजिन

Hyundai आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लाँच करत असते.

hyundai venue 2023 New model news
Hyundai Venue – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Hyundai ही दक्षिण कोरियाची कंपनी आहे. ही एक वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत ही कंपनी लाँच करत असते. ह्युंदाईने नुकतेच Grand i10 Nios आणि अपडेटेड Aura sedan भारतात लॉन्च केली आहे. याआधी Hyundai ने गेल्या वर्षी जूनमध्ये Hyundai Venue Facelift (Hyundai Venue Facelift) हे मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले होते. २०२३ मध्ये कंपनी त्या मॉडेलवर काम करत आहे. २०२३ मध्ये या मॉडेलची येणार अपडेट हे अनेक नवीन फीचर्ससह येतील व यातील इंजिनसुद्धा अपडेटेड असेल.

काय असणार फीचर्स ?

नवीन Hyundai Venue मध्ये नवीन फीचर्स देखील समाविष्ट केले जाऊ शकतात. ज्यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक ५ सीटर केबिन मिळणार आहे. ज्यात फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ऑटो क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री आणि क्रूझ कंट्रोलसह मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील याचा समावेश असणार आहे. यात ब्लू लिंक कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जर, 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम, उंची अॅडजस्टेबल फ्रंट सीट्ससह नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम हे फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. यात अलेक्सा आणि गुगल व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील मिळेल, ज्याला कंपनीने होम-टू-कार (H2C) असे नाव दिले आहे.

हेही वाचा : Hero Scooter: ३० जानेवारीला जबरदस्त फीचर्ससह लाँच होणार Hero Maestro Xoom, जाणून घ्या किती असणार किंमत

सेफ्टी फीचर्स

२०२३ च्या अपडेटेड मॉडेलमध्ये ४ एअरबॅग असू शकतात. मात्र ग्राहकांना हवी असल्यास ६ एअरबॅग कंपनी ऑफर करू शकते. अहवालावर विश्वास ठेवला तर मार्च महिन्यात कंपनी 2023 Hyundai Venue SUV लाँच करू शकते.

शक्तिशाली इंजिन

या फीचर्सनंतर सर्वात महत्वाचे फीचर म्हणजे या मॉडेलचे इंजिन अपडेटेड असणार आहे. नवीन ठिकाणी कंपनी डिझेल इंजिन ऑफर करणे सुरु ठेवणार आहे. मात्र तेच युनिट वापरले जाणार आहे जे Creta मध्ये वापरले गेले आहे. आगामी आरडीई नियमांची पूर्तता करण्यासाठी Hyundai Creta चे इंजिन अपडेट करेल आणि तेच इंजिन या मॉडेलमध्ये वापरले जाईल.

हेही वाचा : JK Tyre ने SUV कारसाठी आणली नवीन सिरीज; महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी डिलरशिप केली सुरु

अपडेटेड डिझेल इंजिन

यामध्ये १.५ लिटरचे डिझेल इंजिन असू शकते. जे ११४ बीएचपी पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. सध्याचे इंजिन ९९ बीएचपी पॉवर जनरेट करते. पण यामध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स असणार आहे. इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) प्रणालीसह इंजिनला नवीन स्टार्ट/स्टॉप फंक्शन देखील मिळणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 17:09 IST
ताज्या बातम्या