Tata Altroz Facelift 2025 features: टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कारची विक्री करते. टाटा मोटर्सच्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत नेहमीच टाटाच्या कारचा समावेश असतो. सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जाते. आता बाजारपेठेत टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे. कारण भारतात नुकतीच Tata Altroz facelift लाँच करण्यात आली असून या कारसाठी ६.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी किंमत मोजावी लागत आहे. प्रिमियम अपडेट्ससह लाँच करण्यात आलेली ही कार आधीपेक्षा अधिक प्रभावी दिसत असून, कारच्या इंटेरिअरपासून एक्सटिरीअरपर्यंत बरेच बदल करण्यात आले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठीसुद्धा कारमध्ये महत्त्वाच्या गोष्टी जोडण्यात आल्या आहेत.

पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच अल्ट्रोजमध्ये मोठा बदल होत आहे. पॉवरट्रेन व्यतिरिक्त, या कारच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. चला या कारच्या पाच मोठ्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे इतरांपेक्षा खूप चांगले आणि मजबूत बनले आहे.

मोठा १०.२५-इंच ड्रायव्हर डिस्प्ले

टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये पूर्णपणे नवीन १०.२५-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे, जो जुन्या ७-इंचाच्या पार्ट-डिजिटल, पार्ट-अ‍ॅनालॉग युनिटची जागा घेतो. हे त्याच्या टॉप मॉडेलसाठी खास आहे, जे एका मोठ्या एचडी स्क्रीन मॅप व्ह्यू आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंगसह येते.

नवीन तू स्पोक स्टिअरिंग व्हील

नवीन अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये दोन-स्पोक स्टिअरिंग व्हील आहे ज्यावर ग्लॉस-ब्लॅक पॅनेलमध्ये इल्यूमिनेटेड टाटा लोगो आहे. त्यात स्मार्ट डिजिटल स्टीअरिंग क्रूझ, ऑडिओ आणि फोन कॉल सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

कनेक्टेड टेल लाइट्स

आगामी अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये एलईडी लाईट बार आहे, जो लाईट्सना जोडतो आणि एक T बनवतो. ज्यामुळे ही कार पूर्वीपेक्षाही चांगली दिसते.

फ्लश-टाइप डोअर हँडल

अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये पुल-टाइप फ्रंट डोअर हँडल्सऐवजी टाटा कर्व्हसारखे फ्लश-टाइप डोअर हँडल्स आहेत, ज्यात इल्युमिनेशन आहे. मागील बाजूस, टाटा कारमध्ये पूर्वीप्रमाणेच सी-पिलर-माउंट केलेले दरवाजाचे हँडल कायम आहेत.

नवीन कलर ऑप्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट एकूण पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, जे प्रिस्टाइन व्हाइट, प्युअर ग्रे, रॉयल, अंबर ग्लो आणि ड्यून ग्लो आहेत. त्यात दोन नवीन रंगांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, त्याचा डाउनटाउन रेड पेंट आता बंद करण्यात आला आहे.