प्रवाशांना परवडणाऱ्या बाईक टॅक्सी आणि रिक्षा सेवेनंतर आता रॅपीडोने नुकतेच, ‘रॅपीडो कॅब्स’ची सेवा सुरू केलेली आहे. सध्या तरी या कॅब्सची सेवा, दिल्ली, बंगळुरू आणि हैद्राबाद या शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. बाईक टॅक्सीमध्ये ६० टक्के मार्केट शेअर असलेल्या रॅपीडोने आता एक लाख गाड्यांसोबत कॅब सेवासुद्धा सुरू केलेली आहे.

या कॅब्सच्या चालकांकडून कोणतेही कमिशन ही कंपनी घेणार नसल्याचे समजते. असे असले तरीही, रॅपीडोच्या चालकांना किमान सबस्क्रीप्शन फी भरावी लागणार आहे. रॅपीडो अॅपचा वापर करून जेव्हा कॅबचालक १० हजार रुपये कमावेल तेव्हा त्याला त्यावर ५०० रुपये इतकी सबस्क्रीप्शन फी भरावी लाभणार आहे, असे या कंपनीने सांगितले आहे.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध

हेही वाचा : मारुतीची ‘ही’ लोकप्रिय कार येणार नव्या रूपात! पाहा कोणते होणार महत्त्वपूर्ण बदल….

“देशभरात आमच्या बाईक, टॅक्सी आणि रिक्षा सेवेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आता ही नवीन कॅब सेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. आमच्या SaaS आधारित प्लॅटफॉर्ममुळे जी कमिशन पद्धत आहे, त्यामध्ये बदल घडून आले आहेत. यामध्ये ड्रायव्हरकडून कमिशन घेण्याऐवजी, त्यांच्याकडून केवळ सॉफ्टवेअर वापर करण्याची फी आकारली जाईल. ज्यामुळे, या उद्योगामध्ये फार मोठा बदल होऊ शकतो”, असे काहीसे रॅपीडोचे सह संस्थापक पवन गुंटूपल्ली म्हणतात.

“ग्राहकांचा, प्रवाशांचा विचार करूनच या सेवांचे दर ठरवले असल्यामुळे, ही सेवा प्रत्येकालाच अगदी सहज परवडणारी आहे”, असे देखील पवन म्हणतात.
सध्या रॅपीडोची बाईक टॅक्सी, रिक्षा आणि आता कॅब सेवा ही भारतातील १०० शहरांतून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे.