Affordable 6 Airbags Cars in India: सायरस मिस्त्री, विनायक मेटे या दिगज्जांच्या अपघाती मृत्यूनंतर वाहन चालवताना विशेषतः कारच्या सुरक्षेचा मुद्दा बराच चर्चेत आहे. वाहन चालकासह इतर प्रवाशांसाठीसुद्धा सीट बेल्ट ते सर्व कारमध्ये किमान ६ एअरबॅग्ज अनिवार्य करण्यापर्यंत अनेक नवे नियम येत्या काळात अंमलबजावणी केली जाईल. तुम्हीही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एअरबॅगच्या वैशिष्ट्याची विशेष काळजी घ्या. आजच्या या लेखात आपण भारतातील काही विश्वसनीय कंपनीच्या गाड्यांचे पर्याय पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला अगदी कमी खर्चात ६ एअरबॅग्सह सर्व हाय- टेक सुविधा मिळतील.

Anand Mahindra Car Collection: कोट्यवधींचे मालक आनंद महिंद्रा वापरतात ‘या’ बजेट फ्रेंडली कार; तुम्हीही घेऊ शकता

Maruti Suzuki Baleno – Zeta

मारुती सुझुकीची प्रीमियम हॅचबॅक कार बलेनोचे अपडेटेड मॉडेल हे सुरक्षेच्या दृष्टीने बारकाईने तयार करण्यात आले आहे. या गाडीच्या टॉप एंड व्हेरिएंटमध्ये म्हणजेच झेटा आणि अल्फा व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्स दिल्या आहेत. या कारची किंमत ८.२६ लाख रुपये इतकी आहे. ३६० डिग्री कॅमेरा, ब्रेक असिस्ट, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि आयसोफिक्स चाईल्ड सीट अँकरेज यासारखे अतिरिक्त फायदे सुद्धा या कारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. सद्य घडीला ६ एअरबॅग्स असणारी ही देशातील सर्वात स्वस्त गाडी आहे.

Kia Carens

किआ मोटर्सची ७ सीटर करेन्स ही भारतातली दुसरी सर्वात स्वस्त ६ एअरबॅग्स असणारी कार आहे. या कारची किंमत ९.६० लाख रुपयांपासून सुरू होते. विशेष म्हणजे या कारच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

Hyundai i20 – Asta Opt

ह्युंदाई आय २० कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये म्हणजेच Hyundai i20 Asta Opt साठी कंपनीने ६ एअरबॅग्स दिल्या आहेत. या मॉडेलची किंमत ९.५४ लाख रूपये आहे. ६ एअरबॅग्सशिवाय ईबीडीसह एबीएस, हायलाइन टीपीएमएस, ईएससी, हिल असिस्ट कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स अशी अन्य वैशिष्ट्य सुद्धा यात समाविष्ट करण्यात आली आहेत.

Hyundai i20 N Line – N8

ह्युंदाई आय २० प्रमाणे या कारच्या Hyundai i20 N Line मध्ये ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. या कारची किंमत १०.९३ लाख रुपये इतकी आहे. १.० लीटर टीडीजेआय टर्बो पेट्रोल इंजिनसह ६ स्पीड आयएमटी आणि ६ स्पीड डीसीटीचा पर्याय ग्राहकांना आकर्षित करत आहे.

Hyundai Venue SX (O)

ह्युंदाई वेन्यू या एसयूव्हीच्या Hyundai Venue SX (O) व्हेरिएंट्समध्ये ६ एअरबॅग्स आहेत. या मॉडेलची किंमत ११.३७ लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये हायलाइन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम असल्याने प्रवासात टायर्स अचानक फुटणे किंवा पंक्चर झाल्याने तोल जाणे असे अपघात टळू शकतात.