Anand Mahindra Car Collection: आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा कंपनीतुन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कारविक्री होते. नवनवीन मॉडेलसह भारतीय कुटुंबाला साजेसे असे कार डिझाईन पुरवण्यामध्ये महिंद्रा कंपनीचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या सामान्य नागरिकांचा व विशेषतः भारतीय कुटुंबाला लक्षात ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे महिंद्रा कंपनीच्या गाड्या या स्पोर्टी व क्लासिक कणखर लुकसाठी सुद्धा ओळखल्या जातात. इतक्या वैविध्यपूर्ण गाड्यांच्या कंपनीचे मालक म्हणजे आनंद महिंद्रा हे स्वतः कोणत्या गाड्या वापरतात याविषयी तुम्हालाही कुतुहूल असेलच ना?

कारच्या कंपनीचे मालक असुनही आनंद महिंद्रा यांच्या ताफ्यात मर्यादित गाड्या आहेत, तसेच या सर्व गाड्या अगदी बजेटमधील आहेत. आनंद महिंद्रा यांच्या गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश कारची नावे ही महिंद्रा यांच्या सोशल मीडिया फॉलोवर्सने सुचवलेली आहेत. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात म्हणूनच अनेकदा नव्या कारच्या नावांविषयी ते आपल्या फॉलोवर्सचीच मदत घेतात. चला तर मग जाणून घेऊयात आनंद महिंद्रा नेमक्या कोणत्या गाड्या वापरतात..

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

Mahindra Bolero Invader: या गाडीची विक्री कंपनीने बंद केली असली तरी आनंद महिंद्रा स्वतः अजूनही ही गाडी वापरतात. या एसयूव्हीला तीन दरवाजे आहेत. बोलेरोपेक्षा ही गाडी अधिक क्लासिक दिसते. एसयूव्हीला सॉफ्ट टॉप, मागच्या बाजूला फेसिंग बेंच सीट्स आणि अडीच लिटर डिझेल इंजिन आहे.

Mahindra TUV300: आनंद महिंद्रा यांनी २०१५ मध्ये स्वतःसाठी TUV 300 खरेदी केली होती. या गाडीचा रंग ऑलिव्ह ग्रीन कलर असून सानुकूलित डिझाईन तयार केले आहे. वाहनाला कणखर लूक देण्यासाठी त्याला एक आर्मर किट बसवण्यात आलं आहे. या गाडीची किंमत ७ ते ८ लाख रुपये आहे.

Mahindra TUV300 प्लस: आनंद महिंद्रा यांनी TUV300 Plus सुद्धा आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती त्यांच्या ट्विटर फॉलोअर्सच्या सांगण्यानुसार महिंद्रा यांनी कारचे नाव “ग्रे घोस्ट” ठेवले. TUV300 Plus हे आनंद महिंद्रासाठी बनवलेले एक सानुकूलित युनिट असून ते विशेष स्टील-ग्रे शेड मध्ये तयार करण्यात आले आहे.

Money Saving Hacks: कार विकत घेताना ‘हे’ महागडे फीचर वगळून करा मोठी बचत; पहा टिप्स

Mahindra Scorpio: महिंद्रा स्कॉर्पिओ हे कंपनीचे लोकप्रिय वाहन आहे, या गाडीचा वापर आनंद महिंद्रा देखील करतात. आनंद महिंद्रा यांच्याकडे फर्स्ट जनरेशन स्कॉर्पिओ आहे. काळ्या रंगाच्या या वाहनात ४ X ४ फीचर समाविष्ट करण्यात आले आहे.

Mahindra Alturas G4: ही कंपनीची सर्वात महागडी आणि फ्लॅगशिप कार आहे. टोयोटा फॉर्च्युनरला तगडी स्पर्धा देणाऱ्या या गाडीचे नाव आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या Alturas G4 चे नाव बाझ असे ठेवले आहे.