Atiq Ahmad Car Collection: देशात सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुख्यात बाहुबली अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. पोलिस कोठडीत मारला गेलेला बाहुबली अतिक अहमदकडे अनेक आलिशान गाड्या होत्या. अतिकला गाड्यांची खूप आवड होती. चला तर पाहूया त्याचे कार संग्रह…

अतिकच्या नावावर होत्या अनेक गाड्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिक अहमदच्या नावावर अनेक गाड्या होत्या. या गाड्यांमध्ये लँड क्रूझर, जिप्सी, जीप, पियाजिओ जीप, पजेरो यांचा समावेश होता. यासोबतच अतिक त्याच्या अनेक गाड्या कुटुंबाच्या नावावर घेत असे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी गेल्या महिन्यात अतिक अहमदच्या काही आलिशान गाड्याही जप्त केल्या होत्या.

Maruti Gypsy पहिली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिक अहमदची पहिली कार मारुतीची जिप्सी होती. आतिकची पहिली जिप्सी १९९० ची होती आणि तिची नोंदणी उत्तर प्रदेशची होती.

(हे ही वाचा: आनंद महिंद्रा आपल्या Scorpio ते Bolero पर्यंतच्या कारला शेवटी ‘O’ हे अक्षर का लावतात? खरं कारण जाणून व्हाल थक्क )

Mahindra Jeep

अतिक अहमदच्या कार कलेक्शनमध्ये बहुतांश एसयूव्हीचा समावेश होता. जिप्सीव्यतिरिक्त, अतिककडे १९९३ मॉडेलची महिंद्रा जीप होती. जे १९९९ मध्ये विकत घेतले होते. महिंद्राच्या जीपसोबत आतिककडे Piaggio जीप होती. ही देखील महिंद्रा जीप सारखीच १९९३ ची होती पण ती देखील १९९९ मध्ये विकत घेतली गेली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिक अहमद यांच्याकडे टोयोटाची लँड क्रूझर एसयूव्ही देखील होती. लँड क्रूझरशिवाय, अतीक अहमदकडे मित्सुबिशीची सर्वोत्तम एसयूव्ही पजेरो देखील होती. पजेरो २०१२ मध्ये खरेदी केली होती.

Mercedes आणि Hummer

या सर्व वाहनांमध्ये ज्याची सर्वाधिक चर्चा आहे. म्हणजेच हमर. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन कंपनीची सुमारे आठ कोटींची SUV Hummer देखील अतिक अहमदच्या आवडत्या SUV पैकी एक होती. एकेकाळी अतीक अहमद यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान कानपूरमध्ये रोड शो केला होता. ज्यामध्ये Hummer SUV ची खूप चर्चा झाली होती. नंबर नसलेली ही कार त्यावेळी अनेक आठवडे चर्चेचा विषय बनली होती. यासोबतच अतिक अहमदकडे मर्सिडीज कारही होती.

(हे ही वाचा: ४ लाखाच्या ‘या’ मारुती कारनं ग्राहकांना लावलं वेड, ३० दिवसातच १४ व्या स्थानावरुन पोहोचली सातव्या स्थानी, मायलेज २४ kmpl )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुख्यात गुंडाच्या ‘या’ कार्सचं काय होणार?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिकची आलिशान वाहने जप्त करणे सोपे जाणार नाही, कारण बाहुबलीने त्याच्या स्वत:च्या किंवा कुटुंबाच्या नावावर एखादे महागडे वाहन सोडले नाही. म्हणजेच कोणाच्याही मनाला भुरळ घालणारी ही आलिशान वाहने सरकारी नोंदीमध्ये अतिक किंवा त्याच्या कुटुंबीयांची नाहीत. तरीही, प्रयागराज पोलिस अधिकाऱ्यांचा दावा आहे की, जरी काही वाहने ओळखली गेली आणि ती अतीक किंवा त्याच्या कुटुंबाची नसली तरी, खरेदीदाराशी अतीकचे संबंध शोधले जातील आणि हे देखील तपासले जाईल की महागडी वाहने खरेदी करण्याचा आर्थिक स्त्रोत काय आहे.