ऑडी ही एक लोकप्रिय जर्मन कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या कार्स लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने एक नवीन मॉडेल बाजारात लॉन्च केले आहे. भारतात सप्टेंबर महिना आणि त्यापुढील काही महिने हे सणासुदीचे आहेत. अनेक सण या कालावधीमध्ये साजरे केला जाणार आहेत. लोकं सणासुदीच्या काळामध्ये नवीन वाहन खरेदी करण्यास पसंती देत असतात. याच पार्श्वभूमीवर ऑडी कंपनीने ‘Audi Q8’ हे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. या मॉडेलची किंमत, त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊयात.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी क्‍यू८ आमच्‍या प्रॉडक्शन पोर्टफोलिओमधील सर्वात वैविध्‍यपूर्ण SUV आहे. आम्‍हाला आरामदायीपणा, आकर्षकता व टेक्नॉलॉजीने-संपन्‍न अनुभवाचे संयोजन असलेली कार पाहत असलेल्‍या ग्राहकांसाठी लिमिटेड एडिशन ऑडी क्‍यू८ च्‍या लॉन्चसह सणासुदीचा काळ सुरू करण्‍याचा आनंद होत आहे.”

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 12 September: कुठे स्वस्त तर कुठे महागलं पेट्रोल; पाहा तुमच्या शहरातील दर

Audi Q8 : फीचर्स

ऑडी क्‍यू८ या मॉडेलमध्ये एमएमआय व टच रिस्‍पॉन्‍स, हॅप्टिक व अकॉस्टिक फिडबॅक,फ्री टेक्‍स्‍ट सर्च,ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट, स्‍पीड डायलॉग सिस्‍टम,ऑडी म्‍युझिक व स्‍मार्टफोन इंटरफेस आणि प्रिमिअम साऊंड सिस्‍टमसह ३डी साऊंड असे फीचर्स दिले आहेत. तसेच सुरक्षितेतसाठी ८ एअरबॅग्स, ऑडी पार्क असिस्‍टसह पार्किंग एड प्‍लस, रिव्हर्स व्ह्यू कॅमेरा, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलायझेशन प्रोग्राम असे फीचर्स खरेदीदारांना मिळणार आहेत.या मॉडेलच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये रॅप राउंड प्रकारचे डिझाइन दिले आहे. तसेच हाय क्वालिटीचे ऐरो-अकॉस्टिक्‍स केबिन मिळणार आहे. फोर-झोन एअर कंडिशनिंगसह पर्सनल कूलिंग कम्फर्ट देखील यामध्ये देण्यात आला आहे.

Audi Q8 : इंजिन

नुकत्याच लॉन्च झालेल्या ऑडी क्‍यू८ मध्ये कंपनीने ३.० लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ४८ V माइल्ड हायब्रीड सिस्टिमसह येते. हे इंजिन ३४० एचपी पॉवर आणि ५०० एनएम टॉर्क जनरेट करते. या कारचा टॉप स्पीड हा २५० किमी प्रतितास इतका आहे. ही कार ५.९ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी इतका स्पीड पकडते. तसेच या वेगवान आणि सोप्या पद्धतीने शिफ्ट करता येणारी ८-स्‍पीड टिप्‍ट्रॉनिक ट्रान्‍समिशन सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच यात सस्‍पेंशनसह डॅम्‍पर कंट्रोल, इलेक्‍ट्रोमेकॅनिकल पॉवर स्‍टीअरिंग, ऑटो ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह ७ ड्रायव्हिंग मोड्स वापरकर्त्याला मिळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय असणार किंमत ?

ऑडी क्‍यू८ स्‍पेशल एडिशन हे मॉडेल नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. या मॉडेलची किंमत १,१८,४६,००० (एक्सशोरूम) रुपये इतकी आहे. हे स्पेशल एडिशन मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि डेटोना ग्रे या तीन आकर्षक रंगांमध्‍ये ग्राहकांसाठी उपलब्ब्ध असणार आहे.