नवीन २०२४ Pulsar NS160 आणि NS200 लाँच केल्यानंतर, बजाजने आता अपडेटेड Pulsar NS125 देखील भारतात लाँच केले आहे. २०२४ बजाज पल्सर NS125 ला देखील मोठ्या पल्सर (NS160 आणि NS200) प्रमाणेच अपडेट मिळतात. त्याची मस्क्युलर रचना पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. बाईकच्या फ्रंट डिझाईन, इंधन टाकी आणि साइड पॅनलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, त्याच्या हेडलाइट्समध्ये काही अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. यात थंडर-आकाराचे एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊया नव्या बाईकमध्ये काय असेल खास…

2024 Bajaj Pulsar NS 125 बाईकमध्ये काय आहे खास?

बाईकमध्ये आता स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, ज्याद्वारे रायडर एसएमएस आणि कॉल नोटिफिकेशन्स, फोनची बॅटरी लेव्हल यासारखी माहिती पाहू शकतो. याशिवाय, बाईकमध्ये यूएसबी पोर्ट आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) देखील देण्यात आले आहे. यूएसबी पोर्टद्वारे तुम्ही तुमचा फोन किंवा इअरफोन्स इत्यादी चार्ज करू शकता आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमद्वारे सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.

india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार
Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

(हे ही वाचा : सेफ्टीच्या बाबतीत ‘या’ ५ कारला तोड नाय! एका कारची किंमत तर ८ लाखापेक्षाही कमी अन् मिळतात ६ एअरबॅग्ज)

मोटारसायकलमध्ये सिंगल-चॅनल एबीएस सिस्टमसह फ्रंट डिस्क आणि मागील ड्रम ब्रेक आहेत. यात १७ इंची अलॉय व्हील्स आहेत. 2024 Pulsar NS125 मध्ये पूर्वीसारखेच १२५cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. त्याचे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजिन ११.८bhp पॉवर आणि ११Nm टॉर्क जनरेट करते. सस्पेंशनसाठी, बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक आहेत.

बाईकची किंमत किती?

नवीन 2024 Bajaj Pulsar NS125 ची किंमत १ लाख ०४ हजार ९२२ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या किमतीमुळे आता जुन्या मॉडेलच्या तुलनेत ५ हजार रुपयांनी महाग झाली आहे. बाजारात या बाईकची थेट स्पर्धा Hero Xtreme 125R आणि TVS Raider 125 शी होणार असल्याची माहिती आहे.