scorecardresearch

फक्त 1 लाख भरून घरी आणा तुमची आवडती Tata Punch; महिन्याला भरा ‘इतका’ EMI

Tata Punch: खुशखबर, टाटा पंचचे बेस मॉडेल डाउन पेमेंटवर १ लाख भरुन खरेदी करता येणार

फक्त 1 लाख भरून घरी आणा तुमची आवडती Tata Punch; महिन्याला भरा ‘इतका’ EMI
टाटा पंच डाउन पेमेंटवर १ लाख भरुन खरेदी करा (फोटो : संग्रहित छायाचित्र)

Tata Punch Pure: देशात टाटाच्या कारना मोठी मागणी असते. टाटाची पंच कार अल्पावधीच खूप लोकप्रिय झाली आहे. या कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या वाहन खरेदीत टाटा पंचचा बोलबाला आहे. ग्राहकांचाही टाटा पंच खरेदी करण्याकडे कल असल्याचं दिसून येते. तुम्हीही चांगली आणि किफायतीशीर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटा पंच उत्तम पर्याय आहे. तुम्ही स्वस्त दरात टाटा पंच खरेदी करू शकता. चला तर जाणूया घेऊया कसे..

Tata Punch Pure Base Model किंमत

Tata Punch Pure हे या SUV चे बेस मॉडेल आहे, ज्याची किंमत ५,९९,९०० रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे आणि ऑन-रोड रुपये ६,५९,४९१ पर्यंत आहे. या ऑन-रोड किमतीनुसार, रोख पेमेंट मोडमध्ये खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ६.५९ लाख रुपये असणे आवश्यक आहे. परंतु येथे नमूद केलेल्या सुलभ डाउन पेमेंट आणि मासिक EMI योजनांसह, तुम्ही फक्त रु. १ लाख भरून टाटा पंच प्युअर बेस मॉडेल घरी घेऊ शकता.

(हे ही वाचा : केवळ ५० हजारात खरेदी करा Hyundai ची बेस्ट सेलिंग कार, महिन्याला भरा केवळ ‘इतका’ EMI)

Tata Punch Pure Base Model फायनान्स प्लॅन

ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या कारसाठी १ लाख रुपयांचे बजेट बनवले तर बँक ५,५९,४९१ रुपयांचे कर्ज देऊ शकते ज्यावर वार्षिक ९.८ टक्के व्याजदर लागू होईल

Tata Punch Pure Base Model डाउन पेमेंट

टाटा पंच प्युअर बेस मॉडेलवर कर्ज मंजूरीनंतर, तुम्हाला १ लाख रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला ११,८३३ रुपये मासिक EMI भरावे लागेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 19:15 IST

संबंधित बातम्या