Bentley all set to drive out its first-ever luxury electric car : बेंटले कंपनी इलेक्ट्रिक वाहनाच्या जगात रोल्स-रॉइस विरुद्ध जोरदार स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाली आहे. बेंटलेने आपल्या पहिल्या आलिशान इलेक्ट्रिक कारची योजना जाहीर केली आहे. Rolls-Royce Specter ला २०२३ मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. त्याचबरोबर बेंटलेने EV कार लॉन्च करण्याचीही योजना आखली आहे.

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

बेंटले आता इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या जगात प्रवेश करण्यास तयार आहे. कंपनीने बुधवारी जाहीर केले आहे की ती २०२५ मध्ये पहिली पूर्णपणे बॅटरी आधारित लक्झरी कार नक्कीच लॉन्च करेल. सुपर लक्झरी कार निर्मात्या बेंटलेने हे मान्य केले आहे की, मोबिलिटीमध्ये इलेक्ट्रिक पॉवरकडे वळणे आवश्यक झालं आहे. जगभरातील बहुतेक ऑटोमोटिव्ह तज्ञांना असं वाटतंय की हे सेगमेंट आणि प्राईस ब्रकेटमध्ये असेल.

फोक्सवॅगन समूहाचा भाग आहे बेंटले
बेंटली फोक्सवॅगन ग्रुपच्या मालकीची आहे, ज्याच्याकडे बुगाटी आणि पोर्श सारख्या ब्रँडचीही मालकी आहे. फोक्सवॅगन समूहाने आगामी काळात स्वच्छ-ऊर्जा वाहनांसाठी आपली दृढ वचनबद्धता आधीच स्पष्ट केली आहे. त्याच वेळी, बेंटलेने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची घोषणा करून या दिशेने एक पाऊल टाकले आहे. बेंटलेने पुढील दशकात या विभागात $3.4 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे. बेंटलेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एड्रियन हॉलमार्क यांनी एका निवेदनात म्हटले आहे: “आम्ही केवळ लक्झरी कार किंवा टिकाऊ प्रतिष्ठेसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी बेंचमार्क बनण्याचे आमचे ध्येय आहे.”

आणखी वाचा : शानदार ऑफर! झीरो डाऊन पेमेंटवर दोन लाखांमध्ये खरेदी करा Renault KWID

बेंटलेची ईव्ही कार असेल खूप खास
सध्या तरी, सर्वांचे लक्ष पहिल्या बेंटले ईव्हीच्या डिझाइन आणि फिचर्सवर आहे. बेंटले ईव्हीचे कोणतेही डिटेल्स अद्याप समोर आले नसले तरी हे प्रोडक्ट क्लास वन श्रेणीत असेल हे निश्चित आहे. बेंटले अत्यंत लक्झरी वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखले जाते. अशी अपेक्षा आहे की कंपनी त्या सर्व फिचर्सचा समावेश करेल ज्यासाठी ती EV कारमध्ये ओळखली जाते.

आणखी वाचा : धमाकेदार ऑफर! ७ लाखांची Maruti Swift Dzire अवघ्या ३.८ लाखात, जाणून घ्या सविस्तर…

लक्झरी कार बनवणाऱ्या कंपन्यांची घोषणा
बेंटलीचा मुख्य प्रतिस्पर्धी Rolls-Royce ने आधीच २०२३ मध्ये आपली पहिली आलिशान इलेक्ट्रिक कार, Specter लाँच करण्याची घोषणा केली आहे. अॅस्टन मार्टिन आपल्या खरेदीदारांसाठी इलेक्ट्रिक कारच्या नवीन युगाची सुरुवात करण्याची योजना आखत आहे. लोकप्रिय सुपरकार निर्माता फेरारी देखील आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जी २०२५ मध्ये सादर करण्याची योजना आहे.