Best CNG Car: मारुती सुझुकीकडे CNG कारचा भारतातील सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे ज्यात हॅचबॅक, सेडान आणि MPV सारख्या विविध मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनी मारुती अल्टो ते वॅगनआर आणि स्विफ्ट ते मारुती ग्रँड विटारा या मॉडेल्समध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी (मारुती सुझुकी सीएनजी कार) चा पर्याय देत आहे. वॅगनआर, अल्टो आणि एर्टिगा ही काही सर्वाधिक विक्री होणारी सीएनजी मॉडेल्स आहेत. पण, सर्वात मायलेज कार्यक्षम सीएनजी कार कोणती आहे, तुम्हाला माहितेय का? चला तर जाणून घेऊया..

मारुतीची सर्वात जास्त मायलेज देणारी कार

देशात विकणाऱ्या सर्वात जास्त मायलेजची सीएनजी कार मारुती सुझुकीकडे आहे. मारुती सुझुकीची सेलेरियो, सीएनजी वर सर्वात जास्त मायलेज देते. याचे मायलेज ३५ किमी हून जास्त आहे. मारुती सुझुकीची सेलेरियो कार जास्त मायलेज देणारी कार म्हणून त्यात आघाडीवर आहे. यानंतर अल्टो आणि वॅगन आरचा क्रमांक लागतो. जर तुम्ही सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर सेलेरियो हा एक उत्तम पर्याय असू शकतो जो तुम्हाला अधिक मायलेज देऊ शकतो.

(हे ही वाचा : ग्राहकांना झटका! ३ तारखेपासून ‘या’ कंपनीने वाढवल्या बाईक-स्कुटरच्या किमती, आता मोजावे लागणार जास्त पैसे )

Celerio Wagon R, Alto, S-Presso आवृत्त्यांचे मायलेज

मारुती सुझुकीच्या सीएनजी आवृत्ती असलेल्या कार म्हणजे सेलेरियो, वॅगन आर, अल्टो, एस-प्रेसो. यापैकी मारुती सेलेरियो सीएनजीचे मायलेज वॅगन आर, अल्टो, एस-प्रेसोपेक्षा जास्त आहे. मारुती सेलेरियोची सीएनजी आवृत्ती गेल्या वर्षीच्या सुरुवातीला लाँच करण्यात आली होती आणि सीएनजी ३५.६० kmpl मायलेज देते. मारुती WagonR CNG चे मायलेज ३२.५२km आहे, मारुती Alto CNG चे मायलेज ३१.५९km आहे, Maruti Suzuki S-Presso CNG चे मायलेज ३१.२km आहे. अशाप्रकारे, मारुती सुझुकीची सेलेरियो सीएनजी कार इतर सीएनजी कारपेक्षा जास्त मायलेज देते, ज्यामुळे ग्राहकांसाठी ती एक उत्तम पर्याय बनू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेलेरियो किंमत

सीएनजीची किंमत ८० रुपये प्रतिकिलो (काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त) असेल तर मारुतीची ही कार चालवण्याचा खर्च किंमत जवळपास २.२ रुपये प्रतिकिलोमीटर येऊ शकतो. मारुती सुझुकी सेलेरियोची भारतातील किंमत सध्या पेट्रोल आवृत्तीसाठी ५.३७ लाखांपासून सुरू होते. Celerio च्या CNG आवृत्तीची किंमत ६.७४ लाख रुपये आहे. याशिवाय सेलेरियोच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ७.१४ लाख रुपये आहे. यासह, Celerio पेट्रोल देखील खूप इंधन कार्यक्षम आहे जे २४.९७ km/l ते २६.६८ km/l (प्रकारावर अवलंबून) आहे.