Best Mileage Car in India:  प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे एक चांगली चारचाकी कार असावी आणि आपल्या कारने चांगला मायलेज दिला पाहिजे. वाढत्या इंधनाच्या दरांमुळे गाड्यांच्या मायलेजलाही अतिशय महत्व निर्माण झालेले आहे. कुठलेही वाहन खरेदी करताना लोक मायलेजचाही आवर्जून विचार करीत असतात. चांगल्या मायलेजच्या वाहनांची निवड केली जाते. चांगले मायलेज असलेल्या अनेक गाड्या बाजारात दाखल झाल्या आणि काही वेळातच त्यांनी लोकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. भारतात, विशेषत: मध्यमवर्गीय ग्राहक बाजारपेठेतील एका कारचे मोठे खरेदीदार आहेत. त्यांना कमी बजेटमध्ये अशी कार हवी आहे जी चालवायला चांगली आहे आणि मायलेजही चांगली आहे.

मारुतीच्या बहुतेक गाड्या त्यांच्या मायलेजसाठी लोकप्रिय आहेत. आपल्या नव्या अवतारात कंपनीची एक स्वस्त कार बाजारात धुमाकूळ घालत आहे. आम्ही मारुती सुझुकी अल्टो K10 बद्दल बोलत आहोत, ज्यांचे फेसलिफ्ट मॉडेल लोकांना खूप आवडते. ही कार आता पूर्वीपेक्षा उत्तम डिझाइन आणि फीचर्ससह येत आहे. कारची विक्रीही चांगली होत आहे.

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
fraud of 21 lakhs by promising huge investment returns
नवी मुंबई : गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक 
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video

(हे ही वाचा : देशात ‘या’ नव्या ७ सीटर MPV कारच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी, तुफान मागणी पाहून कंपनीला बंद करावं लागलं बुकिंग )

इंजिन

मारुती अल्टो के १० या कारमध्ये नवीन १.० लीटर ३ सिलेंडर के-सिरीज इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ६५ बीएचपी पॉवर आणि ८९ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. यात ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. ही कार २४.९ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील येते. सीएनजीवर ही कार ३३ किमी प्रति किलो इतक मायलेज देते.

किंमत

नवीन Maruti Suzuki Alto K10 चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात Std, LXi, VXi आणि VXi+ यांचा समावेश आहे. CNG व्हर्जन केवळ VXI मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत ४ लाख रुपये ते ५.९६ लाख आहे. तुम्हाला ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay, Android Auto, कीलेस एंट्री, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, मॅन्युअली ॲडजस्टेबल ORVM अशी वैशिष्ट्ये मिळतील.