Best Selling Scooters:  भारतात अगदी सुरुवातीपासून टू व्हीलर्सना खूप मोठी मागणी आहे. भारतात मध्यमवर्गीयांना चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी परवडतात. त्यामुळे भारतात बाइक्सना तगडी डिमांड असते. आपल्या देशात बाइक्सप्रमाणे स्कूटर्सना देखील मोठी मागणी आहे. बाईक्सप्रमाणेच भारतीय बाजारपेठेत स्कूटरसाठी हिरो, सुझुकी, होंडा आणि टीव्हीएससारख्या बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. जरी हीरो मोटोकॉर्प ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक राहिली असली तरी स्कूटरच्या बाबतीत होंडाची स्पर्धा नाही. इतर सर्व कंपन्यांना मागे टाकत होंडाने पुन्हा एकदा बेस्ट सेलिंग स्कूटरचा किताब पटकावला आहे. तुमच्यासाठी एप्रिल २०२३ मध्ये देशातील टॉप ५ सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरची यादी घेऊन आलो आहोत.

बेस्ट सेलिंग स्कूटर

Honda Activa ही पुन्हा एकदा देशात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर ठरली आहे. त्याने इतर सर्व कंपन्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. एप्रिल महिन्यात या स्कूटरच्या १,६३,३५७ युनिट्सची विक्री झाली. एप्रिल २०२२ च्या तुलनेत, Honda Activa ने ५० टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे. अलीकडेच कंपनीने Activa च्या नावावरून 6G नेमप्लेट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती फक्त Honda Activa म्हणून ओळखली जाईल.

Volkswagen India has launched the Taigun GT Line and Taigun GT Plus Sport konw features and prices
कुटुंबाला साजेशी SUV पण लूक एकदम Sporty! Volkswagen च्या ‘या’ गाड्यांची किंमत व फीचर्स एकदा पाहाच
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर

(हे ही वाचा : ५.५ लाखाच्या ५ सीटर कारसमोर बाजारात सर्व पडल्या फेल? खरेदीसाठी लाखो ग्राहकांच्या रांगा, मायलेज ३३ किमी)

टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, जी केवळ ५९,५८३ युनिट्स विकू शकली. TVS ज्युपिटरच्या विक्रीतही एप्रिल २०२२ च्या तुलनेत २ टक्क्यांनी घट झाली आहे.

त्याचप्रमाणे सुझुकी ऍक्सेस ५२,२३१ युनिट्स विकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत TVS Ntorq चौथ्या क्रमांकावर आहे आणि Hero Xoom स्कूटर पाचव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात यापैकी केवळ २६,७३० युनिट्स आणि ११,९३८ युनिट्सची विक्री झाली आहे.