Best Selling Scooter: टू-व्हीलरचा विचार केला तर बाईकसोबत स्कूटरचीही मागणी देशात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजकाल बाजारात येत असलेल्या स्कूटरमध्ये, तुम्हाला गिअर बदलण्याची काळजी करण्याची गरज नाही, बाजारात अशी एकच स्कूटर आहे जी बाकीच्या बाईकवर भारी पडताना दिसत आहे. या स्कूटरसमोर बजाज पल्सर ते हिरो एचएफ डिलक्स या लोकप्रिय बाइक्सही मागे पडताना दिसत आहेत. एका वर्षातच या स्कूटरच्या २१ लाखांहून अधिक युनिट्स खरेदी करण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्‍हाला FY२०२३ मध्‍ये सर्वाधिक विकल्या जाणार्‍या पाच स्‍कूटर्सबद्दल सांगत आहोत.

सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर्स

Honda Activa

Honda Activa ही गेल्या आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर ठरली आहे. वर्षभरात त्याची २१.४९ लाख युनिट्सची विक्री झाली, तर वर्षभरापूर्वी केवळ १८.०८ लाख युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच Honda Activa च्या विक्रीत २५ टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. Honda Activa ची किंमत ७५ हजार रुपया पासून सुरू होते.

(हे ही वाचा : स्वस्तातली कार खरेदी करताय? फक्त ४ लाखात घरी आणा ‘या’ CNG कार, मायलेज अन् ऑफर्स पाहून व्हाल थक्क! )

TVS Jupiter 

TVS ज्युपिटर ही Honda Activa नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर होती, परंतु ज्युपिटर आणि Activa च्या विक्रीच्या संख्येत फरक आहे. TVS ज्युपिटरने गेल्या आर्थिक वर्षात ७.२९ लाख युनिट्सची विक्री केली आहे आणि त्याच्या विक्रीत सुमारे ४४ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, तिसऱ्या क्रमांकावर Suzuki Access स्कूटर आहे, ज्याने FY२०२३ मध्ये ४.९८ लाख युनिट्सची विक्री केली. Suzuki Access ने वार्षिक ८.३० टक्के वाढ नोंदवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यादीत चौथ्या क्रमांकावर TVS NTORQ आणि पाचव्या क्रमांकावर Honda Dio स्कूटर आहे. विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, TVS NTORQ ने गेल्या आर्थिक वर्षात २.९० लाख युनिट्सची विक्री केली आहे आणि या स्कूटरने १६ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. त्याचप्रमाणे Honda Dio स्कूटरने गेल्या आर्थिक वर्षात २.५३ लाख युनिट्सची विक्री केली असून या स्कूटरने १३ टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे.