Electric Scooters Offer: देशात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. त्यातही प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये मोठी उलथापालथ सुरू आहे. अनेक वाहन कंपन्या आपापल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत. या कंपन्यांना आता मोठी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना कमी कमी किंमतीत चांगली ड्रायव्हिंग रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर देणं भाग पडलं आहे. अशातच गेल्या वर्षी देशात लाँच झालेल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलत आहोत. ‘BGauss D15’ इलेक्ट्रिक स्कूटर जी त्याच्या मोठ्या अलॉय व्हील, लांब रेंज आणि अद्वितीय डिझाइनसाठी पसंत केली जाते. तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर ४८,००० रुपयांच्या मोठ्या सबसिडीसह खरेदी करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BGauss D15 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

Begas D15 ही कंपनीची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर आहे, कंपनीने बाजारात दोन व्हेरियंट लाँच केले आहेत. या स्कूटरची किंमत ९९,९९९ रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप मॉडेलमध्ये १,१४,९९९ रुपयांपर्यंत जाते.

(हे ही वाचा : केवळ ३० हजारात तुमची होऊ शकते ‘ही’ क्रुझर बाईक; पाहा ऑफरपासून मायलेजपर्यंत डिटेल्स )

BGauss D15 इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर

केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणार FAME सबसिडी देत आहे आणि या सबसिडी अंतर्गत BGauss D15 या स्कूटरवर ४८,००० रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. या सबसिडीनंतर या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूपच कमी झाली आहे.

BGauss D15 सिंगल चार्जवर देतेयं ११५ किमी रेंज

कंपनीने दावा केला आहे की, बीजी डी १५ या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ३.२ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कूटर स्पोर्ट्स मोडमध्ये केवळ ७ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास इतक्या वेगाने धावते. यात इको मोडदेखील देण्यात आला आहे. या स्कूटरला १६ इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. स्कूटरमधली बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ५.३० तास लागतात. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ११५ किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bgauss d15 electric scooter is available with a subsidy of 48 thousand gives a range of 115 km in a single charge pdb
First published on: 22-01-2023 at 11:49 IST