Hyundai Getz हॅचबॅक कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ३.२८ लाख रुपये आहे आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ५.२० लाख रुपये आहे. जर तुम्हाला ही कार स्वस्तात खरेदी करायची असेल तर तीन वेबसाइट्सवर सेकंड हँड ह्युंदाई गेट्ज हॅचबॅक कार खरेदी करण्याची संधी आहे जिथे तुम्ही ती १.१५ लाख ते १.४४ लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया Hyundai Getz कारचे फीचर्स, इंजिन आणि स्पेसिफिकेशन्स.
Hyundai Getz मध्ये १३४१ cc पेट्रोल इंजिन आहे जे ८३ Ps ची पॉवर जनरेट करते. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे, तर Hyundai चा दावा आहे की Hyundai Getz १५.३ ते १६.८ km मायलेज देते. यासोबतच या हॅचबॅक कारमध्ये ४५ लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.
Hyundai Getz च्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, यात पॉवर स्टीयरिंग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, पॉवर विंडो आणि एअर कंडिशनर यांसारखे अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या हॅचबॅक कारमध्ये एअरबॅग्स मिळणार नाहीत.
आणखी वाचा : केवळ ४ ते ६ लाखांच्या बजेटमध्ये मिळतेय Hyundai Creta, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
Droom वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहिरातीनुसार, तुम्ही ही हॅचबॅक कार १.४४ लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता. ही कार फक्त ७० हजार किमी धावली आहे. ड्रूम वेबसाइटवरून या कारवर ईएमआय आणि कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.
कार ट्रेड वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहिरातीत केवळ १.२५ लाख रुपयांमध्ये ही कार खरेदी केली जाऊ शकते. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्ही तिचे दुसरे मालक व्हाल, तर ही कार फक्त ९४ हजार किलोमीटर धावली आहे.
कार्डखो वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहिरातीनुसार ही कार केवळ १.१५ लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल, या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहिरातीत ही कार केवळ ९० हजार किलोमीटर धावली आहे, जर तुम्ही ही कार घेतली तर तुम्ही दुसरे मालक व्हाल.