जेव्हा आपण नवीन कार खरेदी करतो तेव्हा आपण खूप उत्साही असतो. त्याच्या चमकदार रंगापुढे आपल्याला बाकी सर्व काही फिके वाटते. पण कालांतराने आपली कार जुनी दिसू लागते. जराशा निष्काळजीपणामुळे आपल्या गाडीचा रंग फिका पडू लागतो. याचा थेट परिणाम कारच्या रिसेल मूल्यावर होतो. अशा परिस्थितीत, खालील पाच टिप्सच्या माध्यमातून आपण आपली कार पुन्हा नव्यासारखी चमकवू शकतो.
- वॅक्सिंग आणि पॉलिशिंग
कारवर वॅक्सिंग किंवा पॉलिशिंग करता येते. यासाठी तुम्ही चांगल्याप्रतीचे वॅक्स घ्या आणि विश्वसनीय दुकानातून वॅक्सिंग करून घ्या. हे वॅक्स अतिनील किरणांना वाहनाच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापासून रोखते.
- सिरेमिक/टेफ्लॉन कोटिंग
पेंटचे नुकसान टाळण्यासाठी सिरॅमिक/टेफ्लॉन कोटिंगचा वापर केला जाऊ शकतो. हे कोटिंग पेंटला घाण चिकटू देत नाही. सर्वोत्तम परिणामांसाठी, कोटिंग करण्यापूर्वी योग्य तापमानाचे मूल्यांकन केले पाहिजे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पृष्ठभाग पुसण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरा.
- पार्किंगसाठी छत असणे आवश्यक आहे
आपले वाहन नेहमी अशा ठिकाणी पार्क करा जेथे थेट सूर्यप्रकाश नसेल. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे वाहनाचा रंग खराब होऊ शकतो. भूमिगत पार्किंगमध्ये किंवा छत असलेल्या पार्किंगमध्ये कार पार्क केल्यास ते अधिक चांगले ठरेल.
- कार कव्हर वापरा
जेव्हा तुम्ही गाडी जास्त वेळासाठी पार्क कराल तेव्हा कारवार कव्हर लावायला विसरू नका. कारचे कव्हर एका विशेष सामग्रीचे बनलेले असते, जे केवळ कार खराब होण्यापासूनच संरक्षण करत नाही तर गाडीचे पेंटदेखील संरक्षित करते.
- कार धुणेही तितकेच आवश्यक
पार्किंगशिवाय गाडी चालवतानाही घाण होते. जर ते साफ केले गेले नाही तर ते बऱ्याचवेळा पेंटवर स्थिर होते. म्हणूनच गाडी वेळोवेळी धुत राहणे चांगले. धुतल्यानंतर, कारमधील पाणी योग्यरित्या पुसणे देखील आवश्यक आहे.
