Car Care Tips : पहिल्यांदा कार खरेदी करणे ही एक वेगळी भावना असते. जर तुम्ही पहिल्यांदा कार किंवा कोणतेही गाडी खरेदी केली असेल तर तुम्हाला त्या गाडीविषयी खूप जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे. अनेक अशा गोष्टी असतात ज्या पहिल्यांदा कार खरेदी केल्यानंतर माहिती नसतात. आज आपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे वाहन सुरक्षित वापरू शकता.

कारच्या मॅन्युअल वापराविषयी जाणून घ्या

जर तुम्ही कार खरेदी केली तर तुम्हाला त्या कारबरोबर एक हार्ड कॉपी दिली जाते ज्यामध्ये या कारचा मॅन्युअल उपयोगासह त्याचे फीचर्स, वापर आणि सुरक्षेविषयी माहिती दिली जाते. ही माहिती वाचून तुम्ही तुमची कार योग्य प्रकारे वापरू शकता. जर तुमची ही हॉर्ड कॉपी हरवली असेल तर कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही माहिती वाचू शकता.

कारचे टायर प्रेशर नियमित तपासा

कार मालकाला सल्ला दिला जातो की त्यांनी त्यांच्या कारच्या टायरची नियमित तपासणी करावी आणि त्याबरोबर टायरचा प्रेशर योग्य आहे का, हे सुद्धा तपासावे. यामुळे तुम्ही अपघातापासून वाचू शकता. यामुळे तुमचा टायर दीर्घकाळ टिकू शकतो आणि टायरचा स्फोट होण्यापासून तुम्ही वाचवू शकता.

कारचे इंजिन नेहमी स्वच्छ ठेवा

इंजिन हा कारचा मुख्य भाग आहे. कारला सुरक्षित ठेवण्यासाठी कारचे इंजिन स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच शुद्ध इंधनाचा वापर करावा आणि कोणत्याही प्रकारचा कचरा इंजिनमध्ये जाऊ नये, याची काळजी घ्यावी.

कारची बॅटरी स्वच्छ ठेवा

बॅटरी कार सुरू करण्यासाठी, हॉर्न वाजवण्यासाठी, लाइट आणि अन्य गोष्टींसाठी खूप उपयोग होतो. त्यामुळे सल्ला दिला जातो की कारची बॅटरी वारंवार स्वच्छ करणे गरजेचे आहे.

ब्रेक फ्लूड तपासा

ब्रेक योग्य प्रकारे काम करण्यासाठी ब्रेक फ्लुडची आवश्यकता असते. ब्रेक फ्लुडशिवाय तुमच्या गाडीचा ब्रेक काम करणे बंद करेन. त्यामुळे ब्रेक फ्लुडची तपासणी करून वाहन चालवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केबिन एअर फिल्‍टर

एअर केबिन फिल्टर हा कोणत्याही कारच्या हीटिंग आणि कूलिंग सिस्टममध्ये महत्त्वाचा घटक असतो कारमधील एअर सिस्टिम व्यवस्थित ठेवण्यासाठी केबिन एअर फिल्टर आवश्यक आहे जर तुमची कार कुलिंग करत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला केबिन एअर फिल्टर बदलण्याची गरज आहे.