महिंद्रा कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे. महिंद्राची सर्वाधिक विकली जाणारी आणि जबरदस्त आकर्षक कार स्कॉर्पिओ नव्या रूपात सादर करण्यात आली आहे. महिंद्राच्या नवीन ‘स्कॉर्पिओ-एन’ची डिलिव्हरी आजपासून सुरू झाली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि महिंद्रा डीलरशिपवर आज सकाळी अकरा वाजल्यापासून त्याची बुकिंग सुरू झाली आहे. महिंद्राने या वर्षी डिसेंबरपर्यंत स्कॉर्पिओ एनच्या २० हजार युनिट्स वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. चला तर मग या लक्झरी कारच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल व किमतीबद्दल जाणून घेऊया.

नवीन स्कॉर्पिओ डिझाइन

महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये तयार करण्यात आली आहे. नवीन स्कॉर्पिओची रचना महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओमध्ये करण्यात आली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एनचा इन्स्ट्रुमेंट कन्सोल पूर्णपणे डिजिटल असेल. तसेच, टचस्क्रीन प्रणाली मोठ्या आकाराची आहे. ८-इंचाची टचस्क्रीन असलेली इन्फोटेनमेंट प्रणाली तिचे आतील भाग मजबूत बनवते.

आणखी वाचा : तुम्ही ‘या’ दोन कंपन्यांच्या गाड्या वापरत असाल, तर वेळीच व्हा सावध; नाहीतर सहपणे होऊ शकते चोरी

नवीन स्कॉर्पिओला सनरूफ मिळेल

महिंद्राने आपल्या नवीन स्कॉर्पिओमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स जोडले आहेत. पण ज्या वैशिष्ट्याची सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे सनरूफ. प्रथमच, महिंद्राने स्कॉर्पिओच्या कोणत्याही प्रकारात सनरूफ फिचर जोडले आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ-एनला ‘बिग डैडी ऑफ एसयूवी’ म्हणून प्रमोट करत आहे. नवीन स्कॉर्पिओची रचना जुन्यापेक्षा वेगळी आहे. कंपनीने याला आधुनिक डिझाइन दिले असून त्याचा आकारही जुन्या स्कॉर्पिओपेक्षा मोठा आहे.

एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प

डायनॅमिक एलईडी टर्न इंडिकेटरस एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, सी-आकाराचे डेटाइम रनिंग एलईडी आणि फ्रंट बंपरवर एलईडी फॉग लॅम्प्स यांसारखी वैशिष्ट्ये नवीन एसयूव्हीमध्ये देण्यात आली आहेत. नवीन स्कॉर्पिओ-एन मध्ये ६ एअरबॅग मिळतील. तसेच व्हॉईस कमांड आणि क्रूझ कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने २.०-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन सादर केले आहे.

आणखी वाचा : यंदाच्या नवरात्रीमध्ये २९ हजारांच्या डिस्काउंटवर खरेदी करा ‘ही’ कार

बाजारात टक्कर

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन मध्ये, ब्रेक लाईट्स दरवाजाच्या वरच्या बाजूला लावले आहेत आणि टेल लाईट्स देखील सी-आकारात आहेत. तसेच नवीन स्कॉर्पिओचा दरवाजा मागून उघडणार नाही. मागच्या सीटवर जाण्यासाठी मधल्या सीटला दुमडण्याची गरज नाही. महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ एसयूव्ही बाजारात एमजी हेक्टर, टाटा सफारी, ह्युंदाई अल्काझार आणि जीप कंपास यांच्याशी स्पर्धा करेल.

किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिंद्राच्या या स्कॉर्पिओला बाजारात प्रचंड मागणी आहे. स्कॉर्पिओ-एनने पहिल्याच दिवशी बुकिंगच्या बाबतीत विक्रम केला होता. अवघ्या एका मिनिटात २५ हजार स्कॉर्पिओ-एन चे बुकिंग झाले. महिंद्रा स्कॉर्पिओ एनची किंमत ११.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २३.९० लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.