Honda मोटारसायकल अँड स्कूटर ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Dio या मोटो स्कूटरचे नवीन टॉप व्हेरिएंट लॉन्च केले आहे. भारतीय बाजारामध्ये कंपनीने Honda Dio H-Smart लाँच केली आहे. कंपनीचे हे तिसरे प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये स्मार्ट सिस्टीम देण्यात आली आहे. याआधी होंडा Activa आणि Activa १२५ मध्ये स्मार्ट-की हे फिचर देण्यात आले होते. होंडा डिओ एच- स्मार्ट या गाडीची किंमत आणि फीचर्सबद्दल जाऊन घेऊयात. होंडाच्या लेटेस्ट एडिशनमध्ये काय असणार नवीन ? होंडाकडून Dio H-Smart गाडीचे डिटेल्सबाबत अजून खुलासा केलेला नाही. मात्र यामध्ये होंडा Activa सारखेच फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये स्मार्ट-की सिस्टीम असू शकते. ही स्मार्ट- की स्मार्ट फाइंड, स्मार्ट अनलॉक, स्मार्ट स्टार्ट आणि स्मार्ट सेफ फीचर्स तसेच इंजिन immobilizer सह येऊ शकते. Honda Dio H-Smart मध्ये अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील दिसू शकतो. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे. हेही वाचा : मारूती सुझुकीने लॉन्च केली ‘ही’ नवीन Alto; ग्राहकांना सीएनजी आणि पेट्रोल व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येणार इंजिन आणि गिअरबॉक्स होंडा डिओच्या लेटेस्ट एडिशनमध्ये सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड टेक्नॉलॉजीवर आधारित १०९.५१ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७. बीएचपी पॉवर आणि ८.९ एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच ट्रान्स्मिशनसाठी इंजिनला CVT गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. नवीन स्कूटर ही OBD2-उत्सर्जन अनुरूप आहे. किंमत Honda Dio H-Smart ची एक्स शोरूम किंमत ही ७७,७१२ रुपये आहे. लेटेस्ट होंडा डिओ भारतीय बाजारपेठेत स्टॅंडर्ड, डिलक्स आणि एच-स्मार्ट या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. दिल्लीमध्ये या स्कूटरची एक्स शोरूम किंमत ७०,२११ रुपयांपासून ते ७७,४१२ रुपयांपर्यंत आहे. डिओचे टॉप व्हेरिएंट H-स्मार्टचे बुकिंग सुरू झले आहे. लवकरच त्याची डिलिव्हरी देखील सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तसेच होंडा डिओ स्कूटर TVS Scooty Zest, Hero Xoom सारख्या स्कूटरशी स्पर्धा करेल.