Do Bike Service At Right Time : बाईकच्या इंजिनाच्‍या दीर्घायुष्‍यासाठी सर्व्हिसिंग वेळेवर होणे खूप महत्त्‍वाचे आहे. नव्‍या बाईकवर सुरुवातीला इंजिनबरोबर त्‍याच्‍या इतर पार्ट्सवरदेखील जास्‍त दबाव पडत असतो. त्‍यामुळे जवळपास सर्वच बाईक उत्‍पादक कंपन्‍या ५०० किलोमीटरनंतर पहिली सर्व्हिसिंग करण्‍याचा सल्‍ला देतात. यावेळी सर्व्हिस स्‍टेशनवर बाईकचे टेस्टिंग आणि सर्व्हिसिंग केले जाते. तुमची बाईक किती चालवली आहे आणि ती कशी वापरली आहे यावर सर्व्हिसिंगची योग्य वेळ अवलंबून असते. त्यासाठी सर्व्हिसिंगची (Bike Service) योग्य वेळ कशी ओळखायची यासाठी सोप्या ट्रिक्स :

पहिली सर्व्हिसिंग – नवीन बाईकची पहिली सर्व्हिसिंग साधारणपणे ५००-७५० किलोमीटरनंतर किंवा पहिल्या महिन्याच्या आत करावी.

दुसरी आणि तिसरी सर्व्हिसिंग – सहसा २,५०० किलोमीटर आणि ५,००० किलोमीटरवर होते. ही सर्व्हिसिंग तीन ते चार महिन्यांत केली जाते.

सर्व्हिसिंग इंटरव्हल : बाईकचा नियमित वापर केल्यानंतर तुम्ही दर ३,००० ते ५,००० किलोमीटरवर बाईक चालवल्यानंतर त्याची सर्व्हिसिंग करून घ्यावी. जर तुम्ही बाइक कमी वापरत असाल, तर दर सहा महिन्यांनी एकदा सर्व्हिसिंग करून घ्या.

तेल कधी बदलायचे : इंजिन तेल ३,००० ते ४,००० किलोमीटर अंतरावर बदलण्याची शिफारस केली जाते. कारण- ताजे तेल इंजिनाच्या अंतर्गत भागांना वंगण घालते आणि घर्षण कमी करते.

हेही वाचा…Documents To Sell Your Car: तुम्हाला कार विकायची आहे? कोणती कागदपत्र लागतील? गोंधळ होऊ नये म्हणून ‘ही’ यादी पाहाच

इंजिन आणि इतर महत्त्वाच्या भागांची काळजी :

१. एअर फिल्टर साफ करणे : प्रत्येक सर्व्हिसिंगदरम्यान (Bike Service) एअर फिल्टर साफ केले पाहिजे किंवा बदलले पाहिजे. विशेषतः जर तुम्ही धूळ असणाऱ्या ठिकाणांहून बाइक चालवीत असाल तरी या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

२. स्पार्क प्लग तपासणे : प्रत्येक १०,००० किलोमीटर अंतरावर स्पार्क प्लग तपासा आणि आवश्यक असल्यास तो बदलून घ्या.

३. साखळी आणि क्लच तपासणे : चेन आणि ताण योग्य असावा आणि क्लच केबल्सदेखील नियमितपणे तपासल्या पाहिजेत.

४. हंगामानुसार सर्व्हिसिंग : पावसाळ्यात बाईककडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. कारण- ओलावा, पाणी बाईकच्या इलेक्ट्रिकल्स आणि इतर भागांवर विपरीत परिणाम करू शकतात. सर्व्हिसिंगच्या या काळात ब्रेक, टायर व लाइट्स तपासणे महत्त्वाचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

बाईकची योग्य वेळी सर्व्हिसिंग (Bike Service) केल्याने इंजिनाचे आयुष्य वाढण्यास आणि तिची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यास मदत होते. साधारणपणे एक चांगला नियम म्हणजे दर ३,००० ते ५,००० किलोमीटरनंतर किंवा दर सहा महिन्यांनी एकदा सर्व्हिसिंग करून घेणे. सर्व्हिसिंगदरम्यान, इंजिन ऑइल, एअर फिल्टर, स्पार्क प्लग व चेन तपासणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची बाईक नेहमीच चांगली राहील.