स्वत:ची चारचाकी गाडी असावी असं स्वप्न असतं. मात्र अनेकदा खिशा पाहून भावनांना आवर घालावा लागतो. असं असलं तरी अनेकजण आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या गाड्यांची माहिती घेत असतात. कधी हातात पैसे आले तर मग गाडी घेताना गोंधळ नको, म्हणून चाचपणी करत असतात. आपल्या बजेटमध्ये कोणती गाडी बसेल याचा विचार करतात. सर्वात आधी गाडी घेताना मायलेजचा विचार केला जातो. कारण गाडी खरेदी केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं ते इंधन भरून गाडी चालवणं. त्यामुळे गाडी परवडेल का? हा प्रश्न सर्वात आधी पडतो. आज तुम्हाला आम्ही बजेट कारची माहिती देणार आहोत. यात मारुती सुझुकीच्या दोन आणि डटसनच्या एका गाडीचा समावेश आहे.

मारुती सुझुकी अल्टो
मारुती सुझुकी कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. या गाडीचा मायलेजही चांगला आहे. या गाडीत ७९६ सीसी पेट्रोल इंजिन आहे. ही पाच सीटर कार सर्वात स्वस्त व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येते. जर तुम्ही सीएनजी घेण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. ही गाडी एक लिटर पेट्रोलवर २२.०५ किमीचा मायलेज देते. तर सीएनजीच्या एक किलो गॅसवर ३१.५९ किमीचा मायलेज देते. या गाडीची एक्स शोरुम किंमत ३.१५ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेस्सो
मारुती सुझुकी अल्टोनंतर या गाडीला सर्वाधिक पसंती आहे. एस-प्रेसो ही मायलेज कार आहे. यात ९९८ सीसी पेट्रोल इंजिन आहे. ही पाच सीटर कार सर्वात स्वस्त मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येते. सीएनजी व्हेरियंटसाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. पेट्रोलच्या एक लिटर इंधनावर ही गाडी २१.५३ किमीचा मायलेज देते. तर सीएनजीच्या १ किलो गॅसवर ३१.१९ किमीपर्यंत धावते. या गाडीची एक्स शोरुम किंमत ३.८५ लाख रुपये आहे.

Car Tips: पहिल्यांदा गाडी खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा नुकसान होऊ शकतं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डटसन रेडी-गो
डटसन रेडी गो ही गाडीही या श्रेणीत येत असून सर्वात स्वस्त कार आहे. यात ७९९ आणि ९९९ सीसी पेट्रोल इंजिन दिलं आहे. पाच सीटर कार असून सर्वात स्वस्त मॉडेल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येते. यात सीएनजीचा पर्याय नसून पेट्रोलवरच आहे. ही गाडी एक लिटर पेट्रोलवर २०.७१ ते २२ किमीचा मायलेज देते. या गाडीची एक्स शोरुम किंमत ३.९८ लाख रुपये आहे.