scorecardresearch

फक्त 5 मिनिटांत फुल चार्ज होईल इलेक्ट्रिक स्कूटर, ओलाची गुंतवणूक

ओला इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरची बॅटरी हायटेक बनवण्यासाठी इस्त्रायली बॅटरी टेक फर्म Retordot मध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर ओला इलेक्ट्रिकला आपल्या स्कूटरची बॅटरी अधिक शक्तिशाली बनवण्यात मदत होईल.

OLA-electric

ओला इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरची बॅटरी हायटेक बनवण्यासाठी इस्त्रायली बॅटरी टेक फर्म Retordot मध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर ओला इलेक्ट्रिकला आपल्या स्कूटरची बॅटरी अधिक शक्तिशाली बनवण्यात मदत होईल. या गुंतवणुकीची माहिती ओला इलेक्ट्रिकने दिली. ओला इलेक्ट्रिकनुसार, दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी संयुक्तपणे संशोधन करतील. यासोबतच सध्या या गुंतवणुकीचे सर्व तपशील दोन्ही कंपन्यांनी शेअर केलेले नाहीत.

स्कूटरची बॅटरी ५ मिनिटांत चार्ज होईल – इस्रायली कंपनी स्टोरडॉटच्या मदतीने ओला इलेक्ट्रिक आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या चार्जिंगचा वेग वाढवण्यास सक्षम असेल. XFC बॅटरी तंत्रज्ञानासह, इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी फक्त 5 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. मात्र, दोन्ही कंपन्यांकडून याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

या गुंतवणुकीनंतर, ओलाला स्टोअरडॉटचे फास्ट चार्ज तंत्रज्ञान भारतात बनवण्याचा अधिकार मिळेल, जे आगामी काळात कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ओला इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले आहे की, स्टोअरडॉटमधील गुंतवणूक ही कंपनीने नियोजित केलेल्या अनेक जागतिक धोरणात्मक गुंतवणुकीपैकी पहिली गुंतवणूक आहे.

आणखी वाचा : Hero Splendor Plus केवळ २० ते २७ हजारांच्या बजेटमध्ये, जाणून घ्या ऑफर

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, भारतात ईव्हीसाठी चांगले भविष्य घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच, आम्ही या क्षेत्रात अत्याधुनिक काम करणाऱ्या जागतिक कंपनीसोबत भागीदारी करत आहोत. ओला इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले आहे की, स्टोअरडॉटमधील गुंतवणूक ही कंपनीने नियोजित केलेल्या अनेक जागतिक धोरणात्मक गुंतवणुकीपैकी पहिली गुंतवणूक आहे.

इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी झपाट्याने वाढत आहे – देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामागे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता आहे. यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने घेण्यासही प्राधान्य देत आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Electric scooter fully charged in just 5 minutes ola invests in fast charging technology storedot prp

ताज्या बातम्या